Monday, March 2, 2026
Home बॉलीवूड महेश भट्ट यांचे गुरु असलेले दिग्दर्शक राज खोसला चित्रपट निर्मितीवर प्रेम असूनही या क्षेत्राचा करायचे तिरस्कार

महेश भट्ट यांचे गुरु असलेले दिग्दर्शक राज खोसला चित्रपट निर्मितीवर प्रेम असूनही या क्षेत्राचा करायचे तिरस्कार

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते असलेल्या महेश भट्ट यांनी आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक नव्या जुन्या लोकांना चित्रपटातील सर्वच लहानमोठ्या बारीक गोष्टींची माहिती करून दिली. महेश भट्ट यांच्यासोबत काम करणारे कलाकार नेहमीच त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सर्वांसोबत शेअर करत असतात. ते कशा पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी लोकांना प्रेरित करतात हे अनेकदा आपल्याला लोकांकडून ऐकायला मिळते. मात्र याच महेश भट्ट यांची प्रेरणा कोण आहे याबद्दल कधीच कोणी विचारले नाही आणि नाही कोणाला हा प्रश्न पडला.

आज बॉलिवूडमध्ये महेश भट्ट यांचे नाव खूपच आदराने घेतले जाते. या स्थानामागे महेश भट्ट यांच्या मेहनतीसोबतच राज खोसला यांचा मोठा हात आहे. महेश भट्ट यांची प्रेरणा म्हणून राज खोसला ओळखले जातात. राज खोसला हे बॉलिवूडमधील मोठे निर्माता, दिग्दर्शक आणि स्क्रीनरायटर होते. चित्रपटांच्या जगातले महेश भट्ट यांचे गुरु म्हणून राज खोसला साहेब ओळखले जातात. राज साहेबांबद्दल महेश भट्ट यांनी अनेक मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आज (३१ मे) राज खोसला यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया महेश भट्ट आणि राज खोसला यांच्याबद्दल अधिक.

महेश भट्ट यांना पहिली नोकरी राज खोसला यांनीच दिली. महेश भट्ट हे नोकरी मिवण्याच्या निमित्ताने राज खोसला यांच्याकडे गेले होते. तेव्हा त्यांनी महेश यांना विचारले की, “शून्य ते दहाच्या पट्टीमध्ये तुम्हाला चित्रपटांबद्दल काय माहिती आहे?” त्यावर महेश भट्ट यांनी उत्तर दिले, “शून्य” त्यावर राज खोसला हसले आणि म्हणाले, “सुरुवात करण्यासाठी शून्य खूपच चांगली जागा आहे.” यानंतर आहेस भट्ट यांना त्यांची पहिली सहायक दिग्दर्शकाची नोकरी मिळाली. त्यानंतर महेश भट्ट यांनी त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे आणि अढळ स्थान निर्माण केले.

एकदा महेश भट्ट यांनी ट्विटरवर त्यांचे गुरु असणाऱ्या राज खोसला यांच्यासोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला होता. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “एक प्रशिक्षक तो असतो जो तुम्हला तुमच्यात एक आशा दाखवु शकतो. माझे गुरु असलेल्या राज खोसला यांच्यासोबत माझा एक फोटो.” पुढे महेश भट्ट यांनी लिहिले, “‘मेरा गाव मेरा देश’ चित्रपटासटाही मी राज साहेबांसोबत सहायक म्हणून काम केले. राज खोसला यांनी गुरुदत्त यांच्या सहाय्यकाच्या स्वरूपात त्यांच्या कामाला सुरुवात केली होती.”

महेश भट्ट यांनी राज यांच्याकडून केवळ चित्रपट निर्मितीचेच धडे नाही घेतले तर त्यांच्याकडून त्यांनी संगीताचा वारसा देखील संपादन केला. राज खोसला यांना आजही चित्रपटांमध्ये संगीताचे सीन सर्वोत्कृष्ट पद्धतीने शूट केल्याचे श्रेय दिले जाते. या गोष्टी राज यांनी त्यांचे गुरु असलेल्या गुरुदत्त यांच्याकडून प्राप्त केल्या. ‘लग जा गले’, ‘मेरा साया साथ होगा’, ‘जाने क्या बात है’, ‘है अपना दिल तो आवारा’, ‘ये है बॉम्बे मेरी जान’ आदी राज खोसला यांनी शूट केलेले उत्तम गाणे आहेत.

राज खोसला यांनी एकदा महेश भट्ट यांना सांगितले होते की, “माझे चित्रपट निर्मितीवर प्रेम आहे. मात्र चित्रपटसृष्टी मला अजिबात आवडत नाही. हा एक पराभूत झालेला खेळ आहे ज्यात विजय कोणाचाच होत नाही.” देव आनंद यांच्या सांगण्यावरून गुरुदत्त यांनी त्यांच्या ‘बाजी’ सिनेमात सहायक म्हणून राज खोसला यांना संधी दिली होती. त्यावेळी ते केवळ २६ वर्षांचे होते. त्यानंतर गुरुदत्त यांनी त्यांच्या ‘सीआयडी’ सिनेमातून राज खोसला यांना दिग्दर्शक म्हणून ब्रेक दिला. यात देव आनंद मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा