Wednesday, January 15, 2025
Home भोजपूरी भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ल्याने तिच्या मादक अदांनी वाढवला इंटरनेटचा पारा, डान्स व्हिडिओमध्ये दिसल्या कातिलाना मुव्हज

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ल्याने तिच्या मादक अदांनी वाढवला इंटरनेटचा पारा, डान्स व्हिडिओमध्ये दिसल्या कातिलाना मुव्हज

भोजपुरी इंडस्ट्रीमधील अभिनेत्री सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असतात. या अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज नेहमीच त्यांना प्रकाशझोतात आणतो. याच भोजपुरी इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय नाव म्हणजे नम्रता मल्ल्या. नम्रतेने तिच्या बोल्ड आणि मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले आहे. सोशल मीडियावर नम्रता सतत तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या पोस्टची तिचे फॅन्स आतुरतेने वाट बघत असतात. तिचा हॉट आणि सिझलिंग अंदाज लोकांना नेहमीच तिच्याकडे आकर्षित करत असतो. नुकताच नम्रताने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

नम्रताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत असून, या व्हिडिओमधील तिच्या अदा आणि मूव्हज कातिल असून, खूपच कमी वेळात हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. नम्रताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती डान्ससोबतच ट्वर्क करताना देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाची बिकिनी घातली असून, त्यावर पांढऱ्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहे. केसांचा कर्ली बन केला असून, थोड्या मेकअपमध्ये ती कमालीची आकर्षक आणि मादक दिसत आहे.

भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये आपल्या हॉटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या नम्रताची फॅन फॉलोविंग सतत वाढताना दिसत असून, याआधी देखील तिने सोशल मीडियावर डान्सने आग लावली आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते, जे खूपच कमी वेळात व्हायरल होतात. नम्रता मल्ल्या एक मॉडेलसोबतच, अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता खेसारी लालसोबत ‘दो घुंट’ या गाण्यात काम केले आहे. पुन्हा एकदा हे दोघं सोबत काम करताना दिसू शकतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा