Monday, March 23, 2026
Home अन्य सलमान खानच्या गाण्यांची जादू परदेशातही! ‘चुनरी चुनरी’ गाण्यावर नाचताना दिसली इटालियन नवरी

सलमान खानच्या गाण्यांची जादू परदेशातही! ‘चुनरी चुनरी’ गाण्यावर नाचताना दिसली इटालियन नवरी

बॉलिवूडची गाणी आणि डान्स सर्वांनाच आवडतो. बॉलिवूड गाण्यांची क्रेझ देशातच नाही, तर जगभरात पाहायला मिळते. विशेषतः लग्नसमारंभात बॉलिवूडची गाणी धमाल करतात. बर्‍याच परदेशी लग्नांमध्येही तुम्हाला बॉलिवूडच्या गाण्यांवर लोक नाचताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक इटालियन नववधू बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. खरं तर, ती सलमान खान (Salman Khan) आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्या ‘आजा ना छु ले मेरी चुनरी सनम’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या वधूने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला असून, ती वरासोबत येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच सर्व पाहुणे दोघांकडे पहात आहेत. मग वधू अचानक नाचू लागते. ती नृत्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. तिला पाहून सर्व पाहुणेही पुढे येतात आणि लहानांपासून ते मोठे सगळेच नाचताना दिसतात. हा व्हिडिओ २०१५चा असला. तरी चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला असून, तो सध्या व्हायरल होत आहे. (italian bride did dance on salman khan and sushmita sen song)

‘आजा ना छू ले मेरी चुनरी सनम’ हे गाणे सलमान खान आणि सुष्मिता सेनवर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे ‘बीवी नंबर १’ या चित्रपटातील आहे. हे गाणे अनुराधा श्रीराम आणि गायक अभिजीत यांनी गायले आहे, तर या गाण्याचे संगीत अनु मलिक यांनी दिले आहे. हे गाणे सलमानच्या हिट गाण्यांपैकी एक आहे.

हे देखील वाचा