Tuesday, June 24, 2025
Home हॉलीवूड हॉलिवूड अभिनेत्री एम्बर हर्ड बनली जगातील सर्वात सुंदर महिला, वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे केले सिद्ध

हॉलिवूड अभिनेत्री एम्बर हर्ड बनली जगातील सर्वात सुंदर महिला, वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे केले सिद्ध

जगात सर्वाधिक सुंदर कोण? असा प्रश्न विचारला तर निश्चित उत्तर कोणालाच सांगता येणार नाही. कारण जगभरात एकापेक्षा एक सुंदर व्यक्ती पाहायला मिळतात. आणि सौंदर्य कशात मोजायचे हाही मुद्दा सर्वप्रथम आलाच. त्यामुळेच आत्तापर्यंत जगातील सुंदर व्यक्ती शोधायला सर्वांनाच अडचणी येत होत्या. परंतु आजच्या आधुनिक जगतात अशक्य अस काहीच नाही. अलीकडेच एक असा मार्ग समोर आला आहे, ज्याबद्दल जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल फेस मॅपिंग तंत्राद्वारे जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून वर्णन केलेल्या महिलेचे नाव जाणून तुम्हाला सर्वात आश्चर्य वाटेल. ही महिला दुसरी कोणी नसून हॉलिवूड अभिनेत्री अंबर हर्ड (Amber Heard) आहे.

लंडनचे प्लास्टिक सर्जन डॉ. ज्युलियन डी सिवा यांच्या म्हणण्यानुसार, 2016 मध्ये हर्डने या यादीत पहिले स्थान मिळविले होते. ब्रिटीश सर्जन वापरत असलेले तंत्र हजारो वर्षांपासून एखाद्याच्या चेहऱ्याचे सौंदर्य मोजण्यासाठी वापरले जात आहे. डॉ. ज्युलियन डी सिवा यांच्या वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे, जगातील सर्वात परिपूर्ण चेहरा कोणाचा आहे हे शोधून काढले जाते. आणि या तंत्रानुसार, एम्बर हर्डचा चेहरा 91.85 अचूक बसतो.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amber Heard (@amberheard)

 

लंडनचे प्लास्टिक सर्जन डॉ. ज्युलियन डी सिवा यांचे फेस मॅपिंग तंत्र 12 मुद्द्यांवर विश्लेषित करतात. ज्यामध्ये डोळे, नाक, ओठ, हनुवटी, जबडा आणि चेहरा आकाराच्या आधारे ओळखला जातो. हे फेस मॅपिंग तंत्र ‘ब्युटी फीचे गुणोत्तर’ नावाची जुनी ग्रीक गणना प्रक्रिया वापरते. ही केस जॉनी डेपने जिंकली आहे. मात्र हे प्रकरण संपल्यानंतर अंबरने एका इंग्रजी माध्यम वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अंबरने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान आता यापुढे सौंदर्यही मोजता येईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा