Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड सारं जग जिच्यावर फिदा, ती कॅटरिना ऋतिकच्या ‘या’ लूकवर फिदा; पती विकीलाही दिला ‘हा’ सल्ला

सारं जग जिच्यावर फिदा, ती कॅटरिना ऋतिकच्या ‘या’ लूकवर फिदा; पती विकीलाही दिला ‘हा’ सल्ला

परदेशातून भारतात येऊन आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये कॅटरिना कैफ आघाडीवर आहे. अभिनेत्री कॅटरिना हिला ओळखत नाही, असा एकही व्यक्ती कदाचित शोधूनही सापडणार नाही. १९ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणारी कॅटरिनाचा चाहतावर्ग भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. तिच्या प्रत्येक अदावर चाहते फिदा असतात. मात्र, हीच अभिनेत्री आता बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशन याच्या लूकवर फिदा झाली आहे. यादरम्यान तिने आपला पती आणि अभिनेता विकी कौशल याला सल्लाही दिला आहे.

ऋतिक रोशन याच्या दाढीतील लूकवर कॅटरिना कैफ फिदा
कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हे चांगले मित्र आहेत. कॅटरिना ऋतिकच्या दाढीतील लूकवर फिदा झाली आहे. खरं तर ऋतिक बियर्डो कंपनीचा ब्रँड एंबेसेडर आहे. त्यामुळे तो अधिकतर ऋतिक या कंपनीसाठी बियर्ड लूकमध्ये जाहिराती करत असतो. नुकतेच बियर्डोच्या एका जाहिरातीमधून ऋतिकचा लेटेस्ट लूक समोर आला आहे.

याचा व्हिडिओ कॅटरिनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर ठेवला आहे. यासोबतच तिने लिहिले आहे की, ऋतिकची दाढी सर्वांचे लक्ष वेधणारी आहे. तो खूपच शानदार दिसत आहे. दुसरीकडे, या फोटोत कॅटरिनाने तिची पती आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याला टॅग करत ‘हम्म’ असे लिहिले आहे. एकप्रकारे कॅटरिना विकीला अशीच दाढी ठेवण्यासाठी सांगत आहे.

लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर
कॅटरिना आणि विकी (Katrina And Vicky Marriage Date) यांनी मागील वर्षी म्हणजेच ७ डिसेंबर, २०२१ रोजी संंसार थाटला होता. ती शेवटची २०२१मध्ये आलेल्या ‘सूर्यवंशी’ या सिनेमात झळकली होती. यानंतर आता ती ‘फोन भूत’ या सिनेमात झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे मुख्य भूमिकेत आहेत. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. हा सिनेमा यावर्षी ७ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा