पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत १०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई करणारा सिनेमा म्हणजे ‘सैराट’ होय. या सिनेमाच्या यशामुळे सिनेमातील प्रत्येक कलाकाराला अफाट लोकप्रियता मिळाली. त्यापैकीच एक ‘सल्या’ म्हणजेच अरबाज शेख होय. अरबाज याने रिक्षाचालकामुळे झालेल्या मनस्तापाचा पाढा १३ जुलै रोजी वाचून दाखवला होता. यानंतर आता अरबाजच्या एका चाहत्याने त्याचे मत मांडले आहे.
डॉ. केशव नाना क्षीरसागर या चाहत्याने म्हटले की, “प्रिय सल्ल्या (अरबाज शेख- सैराट फेम), मित्रा तुझ्याकडून ६० रुपये जास्त घेतलेला रिक्षावाला भेटला आहे. तू त्याचा फोटो, नाव व रिक्षा नंबर वायरल केलेल्या पोस्ट वर तुझ्या चाहत्यांनी केलेल्या कॉमेंटप्रमाणे त्याला घेऊन येतो, तुम्ही त्याला नागडा करून मारा आणि भीक मागायला लावा. तसेच, अजूनही ज्या काही विकृत गोष्टी कॉमेंटमध्ये लिहल्यात त्या सुद्धा करा. त्या वेड्या रिक्षावाल्याचा मला फोन आला होता, म्हणाला, ‘पावसामुळे पोलिसांनी भिडे पूल बंद केला होता, मला जीवाची भीती वाटली म्हणून काही बिनडोक दुचाकी वाल्यांप्रमाणे मी पाण्यातून गाडी घालण्याची हिम्मत नाही केली. प्रवाश्याला घरातून निघायला उशीर झाला म्हणून मी गाडी पुराच्या पाण्यात टाकली असती आणि गाडी अडकली असती किंवा वाहून गेली असती तर मी आणि घरचे काय खाणार?, म्हणून मी त्यांना पूर्व कल्पना देऊन गाडी वेगळ्या रस्त्याने नेली. तसेच मी त्या प्रवाश्याला कोणतीही शिवी सुद्दा दिली नाही.'”
(ओला, उबेर व रॅपिडो ला अजून अधिकृत परवानगी आपल्या शहरात आणि राज्यात नाही. ते ऍप्स दाखवतील तेच भाडं खर असतं हे अज्ञान आहे. एकमेकांशी स्पर्धा करण्याच्या नादात ते अनेक भांड्यांमध्ये रिक्षाचलकांचे हक्काचे पैसे खातात व प्रवाश्यांना डिस्काउंट दिलं असं भासवतात आणि आता ऍप्सशिवाय भाडी मिळत नसल्याने रिक्षाचालकांना ते ऍप्स वापरण्याशिवाय पर्याय नाही आणि हे ऍप्स बेकायदा असून सुद्धा, अनेक आंदोलने करून सुद्धा निगरगट्ट सरकारी अधिकारी ते बंद का करत नाहीत हे त्यांनाच विचारा. खरं व योग्य व सरकार मान्य भाडं फक्त मीटरच दाखवू शकत ज्यात आता डिजिटल मीटर आल्यापासून हेरा फेरी करणं शक्य नाही. तसेच, त्यात नागरिक व रिक्षाचालक दोघांची फसवणूक होत नाही, असो.)
“आता ही झाली त्याची बाजू, पण त्याच्यावर विश्वास ठेवायला आपण काय येडे आहोत काय ? तो गरीब आहे म्हणजे १००% खोटंच बोलत असणार. त्याला कसले आले भारतीय संविधानातले फेयर ट्रायल बियल असले मूलभूत हक्क. डायरेक्ट फोटो, नाव, नंबर टाकून आपणच न्यायाधीश बनायचं आणि त्याचं virtual mob lynching करून टाकायचं. एव्हढं स्टारडम असताना आणि सोशल मीडिया फॉलोवर असताना पोलीस किंवा RTO मध्ये तक्रार वगैरे करून शहानिशा करायची गरजच नाही. असं पण हे रिक्षावाले फार माजले आहेत. आपल्या हक्काचे टॅक्स चे पैसे खाऊन मौज मजा करतात, कोट्यवधींची संपत्ती जमवतात. कधी ही संघटना, कधी ती संघटना. मी ऐकलं कोट्यावधी रुपये घेतात संघटनेमधून इकडे तिकडे जायला. मी तर म्हणतो सामान्य नागरिक म्हणून आपल्या होणाऱ्या कुचंबनेचा आपला सगळा राग यांच्यावरच काढू, हे आपलं काय उखडणारेत?”
“यांना कसले कामाचे तास बिस. चल म्हटलं की गप चलायचं. आपल्या बापाचे नोकर आहेत हे. यांनी तर आपल्याशी डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिम्मत सुद्धा नाही केली पाहिजे. आपले गुलाम आहेत हे सगळे, स्वतःला माणूस समजण्याची हिम्मत करतात हे मूर्ख कुठले. तुझा तो झुंड पिक्चर बघितला तेव्हा डोक्यात आलं होतं की माणूस वाईट नसतो, परिस्थिती त्याला वाईट बनवते, प्रत्येकाला सुधारायची संधी दिली पाहिजे वगैरे, पण ते पिक्चर मध्ये ठीक आहे, त्याचे आपल्याला पैसे मिळतात. खऱ्या आयुष्यात असलं काही नाही, एक दणदणीत पोस्ट टाकायची आणि समोरच्याचा डायरेक्ट बाजार उठवायचा. असं पण तू आता कुठे सामान्य, कष्टकरी गरिबांमधला राहिलाय. स्टार झालाय तू लेका, त्याची गाडी बुडाली तरी चालेल तुला उशीर नाही झाला पाहिजे.”
“असो, असाच पुढे जात रहा. मला तो रिक्षावाला विचारात होता, “उद्या धंदा करण्यासाठी गाडी रस्त्यावर काढू का नको ? भीती वाटतेय.” आपल्याला काय करायचंय राहू दे उपाशी त्याच्या पोराबाळांना. कळू दे त्याच्या पुढच्या पिढ्यांना पण एखाद्या स्टारच्या नादी लागणं काय असतं ते,” असेही चाहता पुढे बोलताना म्हणाले.
अरबाजने फेसबुकवरून पोस्ट शेअर करत त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला होता.
अरबाज शेखबद्दल घडलेल्या प्रकारानंतर चाहत्याची ही प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तो फक्त ऍडल्ट फिल्मचा हिरो’, रणबीरबद्दलच्या प्रश्नावर नोराचे खळबळजनक विधान
ललित मोदींच्या संपत्तीपुढे सुष्मिताची संपत्ती ‘पाणी कम चाय’, एका सिनेमासाठी आकारते फक्त ‘एवढे’ कोटी
‘भावा फक्त पैसा पाहिजे, मग सगळं होतं’, सुष्मिता ललित मोदींची गर्लफ्रेंड बनताच मीम्स व्हायरल










