Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल. या चित्रपटातील गाणी हिट ठरली. यातील एक ‘तेरी मिट्टी’ हे गाणं चाहत्यांना भलतंच आवडलं. हे गाणं गायलं होतं प्रसिद्ध गायक बी प्राक याने. आपल्या आवाजाने घराघरात पोहोचलेल्या प्राकचं नवीन गाणं नुकतंच रिलीझ झालं आहे. या गाण्याने सर्वांची मने जिंकली असून गाण्याचा व्हिडिओ ट्रेंडिंगला आहे. नेहमीप्रमाणेच प्राकचं गाणं व्हायरल होत आहे. या गाण्याचे चित्रीकरण एका प्रसिद्ध जोडीवर करण्यात आले आहे.

बी प्राकच्या ‘मझा’ या गाण्यावर गुरमीत चौधरी आणि हंसिका मोटवानी यांची सुंदर जोडी दिसत आहे. ही जोडी चाहत्यांना भलतीच आवडताना दिसत आहे. या गाण्याचे लिरिक्स आणि कंपाज जानीने तयार केले आहे, तर अरविंद खैराने व्हिडिओचे दिग्दर्शन केले आहे. या गाण्यामध्ये प्रेमात झालेल्या चुकांचा पश्चाताप दाखवण्यात आला आहे.

हे गाणं सारेगामा म्युझिक चॅनेलवर रिलीझ केलं आहे. या गाण्याला आतापर्यंत ३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

बी प्राकच्या गाण्याला चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक वयाच्या लोकांना हे गाणं आवडताना दिसत आहे.

या गाण्यात दिसणारा गुरमीत चौधरी तो अभिनेता आहे, जो ‘रामायण’ मालिकेतून घराघरात पोहोचला होता. टीव्ही मालिकेव्यतिरिक्त त्याने ‘खामोशियां’, ‘वजह तुम हो’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. दुसरीकडे हंसिका मोटवानीही नुकतीच टोनी कक्करसोबत एका व्हिडिओ गाण्यात झळकली होती.

बी प्राकने अक्षय कुमारच्या ‘फिलहाल’ या अल्बमलाही आवाज दिला होता. हे गाणेही चांगलेच चर्चेत होते. या व्हिडिओबद्दल खास गोष्ट अशी की, या व्हिडिओत अक्षय कुमार, क्रिती सेननची बहीण नुपुर सेननसोबत दिसला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रितेश पांडेच्या ‘लवंडिया लंदन से लाएँगे’ गाण्याची इंटरनेवर धमाल, मिळालेत १ कोटी ६५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-सुहाना खानच्या नव्या व्हिडिओने चाहत्यांमध्ये उडाली झोप, न्युयार्कच्या रस्त्यावर शेअर केला बेस्टीज बरोबरचा व्हिडीओ

-‘कमरिया हिला रही है’ गाण्यावर अमेरिकन अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, भोजपुरी स्टारनेही लावले ठुमके, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा