‘आश्रम ३’मधून बाहेर पडताच ‘या’ अभिनेत्रीने हद्दच केली पार, अंडरवॉटर झाली एकदम बोल्ड

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आदिती पोहणकर हिने खूपच लांबचा पल्ला गाठला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आश्रम ३’ या वेबसीरिजमध्ये काम केल्यानंतर तिच्या प्रसिद्धीत मोलाची वाढ झाली आहे. या वेबसीरिजमध्ये तिने ‘पम्मी पहलवान’ हे पात्र साकारले आहे. या वेबसीरिजमधून बाहेर पडल्यानंतर पम्मी खूपच बोल्ड झाली आहे. याचा प्रत्यय आपल्याला व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतून येतो. या व्हिडिओत पम्मी पहलवान स्विमिंग पूलमध्ये मोनोकिनी परिधान करत मजा-मस्ती करताना दिसत आहे.

बेडरूममधून थेट स्विमिंग पूलमध्ये पोहोचली आदिती
या व्हिडिओत दिसते की, पम्मी पहलवान (Pammi Pahalwan) म्हणजेच आदिती पोहणकर (Aaditi Pohankar)  हिने बेडरूममध्ये लाल रंगाचा लाँग कोट परिधान केला आहे. यानंतर तिने अभिनेत्री बेडवर झोपते आणि थेट पूलमध्ये पोहोचते.

मोनोकिनीमध्ये दाखवला जलवा
‘आश्रम’ या वेबसीरिजमध्ये इंटीमेट सीन्सचा तडका लावणाऱ्या आदिती अंडरवॉटर काळ्या रंगाची मोनोकिनी घातलेली दिसत आहे. अभिनेत्री कधी पाण्याच्या आत पोहताना दिसत आहे, तर कधी कॅमेऱ्यावर किस करताना दिसत आहे.

स्वत: शेअर केला व्हिडिओ
हा व्हिडिओ आदितीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये आदितीने लिहिले की, “भूमी आता रिलॅक्स मूडमध्ये जात आहे. भूमी पम्मी आणि जी माझ्यासोबत जगते. मला तिला पुढच्या वळणावर सोडायचे आहे, जेणेकरून ती आपल्या आयुष्याचा आनंद लुटू शकेल. सर्वात चांगली पद्धत आहे, पूलमध्ये उडी मारणे आणि पाण्याच्या आत जाणे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditi S Pohankar (@aaditipohankar)

‘शी सिझन २’मध्येही झळकली आदिती
आदितीची ‘शी’ या वेबसीरिजचा दुसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. या वेबसीरिजमध्ये आदितीने अनेक इंटीमेट सीन्स दिले आहेत. यामध्ये आदितीव्यतिरिक्त सुहिता थट्टे, शिवानी रांगोळे आणि सॅम मोहन यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in) 

आदितीने यापूर्वी ‘लय भारी’, ‘ट्रकभर स्वप्न’ आणि ‘लव्ह सेक्स और धोका’ यांसारख्या अनेक सिनेमात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post