महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणजे ‘आई तुळजाभवानी’. महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘कलर्स मराठी’वर विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भक्तांच्या हाकेला त्वरित धाऊन येणारी, स्वराज्य रक्षिण्या तळपती तलवार भेट देणारी ‘आई भवानी’, अवघ्या महाराष्ट्राची ‘कुलस्वामिनी’ अर्थात ‘आई तुळजाभवानी’ लवकरच प्रेक्षकांना आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ते गुलीगत सूरज चव्हाण; कोण आहे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील 16 सदस्य
ऋषी कपूर यांच्या निधनावर रणबीर कपूर का रडला नाही? अभिनेत्याने सांगितले मोठे कारण