घटस्फोटानंतर आमिर अन् किरणचा व्हिडिओ आला समोर; म्हणाले, ‘तुम्हाला दु:ख झाले असेल, शॉक बसला असेल…’


नुकतेच बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेतल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते खूप हैराण झाले आहेत. त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांना अनेक प्रश्न विचारत आहेत. अशातच आमिर खान आणि किरण रावचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ( Aamir Khan and kiran Rao’s video viral, says we will live as a family)

आमिर आणि किरणच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते दोघे शेजारी बसले आहेत. या व्हिडिओमध्ये आमिर खान म्हणतो की, “तुम्हा सर्वांना दुःख झाले असेल, चांगले वाटले नसेल. शॉक बसला असेल. आम्ही तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की, आम्ही दोघेही खूप खुश आहोत आणि एक कुटुंब आहोत.”

आमिर खान पुढे म्हणतो की, “आमच्या नात्यात काही बदल झाला आहे, पण आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत. त्यामुळे तुम्ही असा काही विचार करू नका.” या व्हिडिओमध्ये पुढे पाणी फाऊंडेशनचा उल्लेख करत तो म्हणाला की, “पाणी फाऊंडेशन आमच्यासाठी आमचा आझाद आहे. ते आमचं मुल आहे. जसा आझाद आहे, तसचं पाणी फाऊंडेशन आहे. त्यामुळे आम्ही एक कुटुंब म्हणूनच राहणार आहोत. तुम्ही सगळे आमच्यासाठी प्रार्थना करा की, आम्ही नेहमी खुशी राहो. एवढंच सांगायचं होतं आम्हाला.”

शेवटी आमिर खान आणि किरणने सांगितले की, “आम्ही काही दिवसांपूर्वी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पण आता आम्ही याला औपचारिक रूप देणार आहोत. वेगळे झाल्यानंतरही आम्ही आमचे आयुष्य कुटुंबाप्रमाणे जगणार आहोत. आमच्या मुलाप्रती असणाऱ्या आमच्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडणार आहोत.”

आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. या आधी त्याचे रीना दत्तासोबत लग्न केले होते. परंतु 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2005 मध्ये त्याने किरण रावसोबत लग्न केले. आता लग्नाच्या 15 वर्षानंतर जेव्हा त्यांनी घटस्फोटाची बातमी सांगितली, तेव्हा त्यांचे चाहते खूप हैराण झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.