Tuesday, April 16, 2024

‘छोटे भाईजान’चा ‘बिग बॉस’सोबतचा प्रवास संपाला? अब्दूला रडताना पाहून चाहतेही नाराज

सलमान खानच्या शो ‘बिग बॉस 16‘ मध्ये, अब्दू रोजिक सुरुवातीपासूनच चाहत्यांचा आणि कुटुंबातील सदस्यांचा आवडता स्पर्धक होता. बिग बॉसमधील स्पर्धक म्हणून अब्दूला घरोघरी ओळख मिळाली आहे. या शोमध्ये त्याला आपला सिंगिंग टॅलेंटही दाखवण्याची संधीही मिळाली. मात्र, बिग बॉसच्या नुकत्याच झालेल्या प्रोमोमधून चाहत्यांचे हृदय ताेडून टाकणारी बातमी समोर येत आहे.

‘बिग बॉस’च्या घरात अब्दू रोजिक (abdu rozik) याला वेगळी ओळख मिळाली आहे. जेव्हापासून तो सलमानच्या शोमध्ये दिसला तेव्हापासून तो चर्चेत आहे. शोमध्ये येणारे पाहुणे असोत किंवा बिग बॉसचे घरातील सदस्य असोत, प्रत्येकजण अब्दूसोबत मस्ती करताना दिसतो. ज्या घरात मैत्रीचे आणि शत्रुत्वाचे रंग बदलताना दिसतात, त्या घरात अब्दुल सर्वांचा आवडता राहिला. अब्दुचा खेळ सर्वांनाच आवडला. त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याने आतापर्यंत शोमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, बिग बॉस अब्दू रोजिकला शोमधून बाहेर येण्यास सांगत आहे, म्हणजेच चाहत्यांचा आवडता अब्दू रोजिक आता शोमधून बाहेर पडला आहे. अब्दूला अशाप्रकारे शोला अलविदा करताना पाहून चाहते खूप नाराज झाले आहेत. अब्दुल शोमधून बाहेर पडण्याच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला आहे. एवढ्या प्रसिद्धीनंतरही अब्दू घराबाहेर कसा पडला, हे चाहत्याना जाणून घ्यायचे आहे. खुद्द अब्दूही आपल्या मित्रांना मिठी मारून रडताना दिसत आहे.

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अब्दुल कुटुंबीयांना भेटताना खूप भावूक झालेला दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहतेही भावूक झाले आहेत. अब्दू बिग बॉसमधून कसा बाहेर पडला हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. असे काय घडले की, सर्वांचा लाडका स्पर्धक अब्दू याला बिग बॉस शोमधून बाहेर येण्यास सांगितले जात आहे, हे आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कळेल. मात्र, अब्दू या शोमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करेल याची त्याच्या चाहत्यांना खात्री आहे.(abdu rozik eliminated in bigg boss 16 reason weekend ka vaar salman khan emotional fans)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रेमात फसवणूक! डिप्रेशनमधून बाहेर आलेल्या अंजलीचा माेठा खुलासा; म्हणाली, ‘शहरात एकटी…’

Shriram Lagoo Birth Anniversary | आठवण नटसम्राटाची, श्रीराम लागू यांच्या आयुष्यातील हे किस्से तुम्हाला नक्की ठाऊक नसतील

हे देखील वाचा