आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अशीच एक सिरीज म्हणजे मिर्झापूर, या सिरीज ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. यामधील कथाही ड्रामा, क्राईम, जे तुमच्या काळजाला खरोखरच हादरवून टाकेले अश्या प्रकारची मालिका जर तुम्हाला आवडच असेल तर रणदीप हुड्डाची ही एक अशी मालिका आहे. मिर्झापूरच्या कथेला टक्कर दिले आहे. आणि याचे नाव आहे इन्स्पेक्टर अविनाश.
‘इन्स्पेक्टर अविनाश’ ही उत्तर प्रदेशातील एक प्रसिद्ध पोलीस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या खऱ्या आयुष्यातील घटनांवर आधारित एक थ्रिलर वेब सिरीज आहे. या वेब सीरिजची कथा 1990च्या दशकातील उत्तर प्रदेशात घडते. जिथे माफिया राजवट, गुन्हेगारी आणि राजकीय भ्रष्टाचार पसरलेला होता. रणदीप हुड्डाने यात इन्स्पेक्टर अविनाश या निर्भीड आणि धाडसी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. राज्यातील संघटित गुन्हेगारी आणि कुख्यात गुंडांना संपवण्यासाठी अविनाश मिश्राने केलेल्या धाडसी चकमकी आणि विशेष मोहिमांवर ही कथा केंद्रित आहे.
‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजला IMDb रेटिंग 10 पैकी 7.8 आहे. तर ही मालीका तुम्ही जिओहॉटस्टारवर पाहु शकता. माहितीनुसार या मालिकेचा दुसऱ्या सीझनचा टीझरही प्रदर्शित झाला असून, तो लवकरच याच प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. या मालीकेत रणदीप (Randeep)हुड्डा, उर्वशी रौतेला,अमित सियाल, अभिमन्यू सिंग, शालिन भानोत, झाकीर हुसेन हे कलाकार या मालीकेत आहेत.
खूंखार खलनायक प्रेम चोप्राचा जावई आहे हा हिरो, तर अमिर खान ते अजय देवगण सोबत आहे काम


