अभिनेत्री श्वेता तिवारीकडून मुलाला हिसकावण्यासाठी एक्स पतीने केले लज्जास्पद कृत्य, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Abhinav Kohlis Shameful Act To Snatch The Child From Shweta Tiwari CCTV Footage Went Viral


मोठा पडदा असो किंवा छोटा पडदा, त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य खूप वेगळे असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी अनेक अडचणींनी भरलेले असते. असेच काहीसे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीच्या बाबतीत आहे. श्वेता आणि तिचा एक्स पती अभिनव कोहलीमधील तणाव अद्याप कायम आहे. याचा परिणाम त्यांच्या मुलावर पडत आहे.

श्वेता एक सिंगल आई बनून मुलगी पलक आणि मुलगा रेयांशला सांभाळत आहे. परंतु रेयांशच्या सांभाळावर अभिनव आणि श्वेतामधील वाद चांगलाच वाढला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, रेयांश आपल्या सोबत राहावा, अशी अभिनवची इच्छा आहे. मात्र, श्वेता म्हणते की, अभिनवला रेयांशचा सांभाळ करता येणार नाही. त्यामुळे ती आपल्या मुलाच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे.

अशातच आता श्वेताने ठोस पुराव्यासोबत आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी आपल्या सोसायटीची सीसीटीव्ही फुटेज शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनव तिच्याकडून मुलाला हिसकावण्यासाठी लज्जास्पद कृत्य करताना दिसत आहे. या घटनेनंतर श्वेताने अभिनववर आरोप करत आहे. याव्यतिरिक्त अभिनवही तक्रार करतो की, श्वेता त्याला मुलाला भेटू देत नाही.

श्वेताने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर ही सीसीटीव्ही फुटेज शेअर करत लिहिले की, “आता खरं काय ते समोर आलं पाहिजे. (परंतु हा व्हिडिओ माझ्या अकाउंटवर अधिक काळ राहणार नाही. मी हा आता डिलीट करेल. मी खरं काय ते समोर येण्यासाठी हा व्हिडिओ आता पोस्ट करत आहे.) आता हे कारण समोर आले आहे की, माझा मुलगा अभिनवला का घाबरतो.”

ती पुढे बोलताना म्हणते की, “या घटनेनंतर माझ्या मुलगा एक महिना घाबरत होता. तो इतका घाबरला होता की, रात्री त्याला झोपही येत नसायची. त्याचा हात २ आठवडे दुखत होता. आता तो आपले वडील आल्याने किंवा त्यांना भेटण्यापासून घाबरत आहे. मी आपल्या मुलाला या मानसिक त्रासातून जाऊ देऊ शकत नाही. मी त्याला शांत करणे आणि खुश ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. परंतु हा भयानक व्यक्ती, माझ्या मुलाच्या मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवत राहिला. हे गैरवर्तन नाही, तर काय आहे?? हे माझ्या सोसायटीची सीसीटीव्ही फुटेज आहे.”

अभिनव आपल्या मुलाची कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु श्वेताला हे बिल्कुल मान्य नाही. तिला आपल्या मुलाला अभिनवपासून दूर ठेवायचे आहे. मात्र, अभिनव तिच्या आयुष्यात सतत हस्तक्षेप करत राहतो.

श्वेताने कालीरेन टेलिकास्ट या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. याव्यतिरिक्त तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘कसौटी जिंदगी की’, ‘बालवीर’, ‘बेगुसराय’, ‘जाने क्या बात हुई’ या मालिकांचा समावेश आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.