Saturday, March 2, 2024

दु:खद! ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरच्या वडीलांचे निधन, मुलाला सहना हाेईना वेदना

‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरचे वडील अशोक ग्रोवर यांचे निधन झाले आहे. भारत पेचे फाउंडर अश्नीरने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर ही दुःखद माहिती शेअर केली. यासाेबतच नाेटमध्ये त्यांनी वडिलांचा फोटोही शेअर केला आहे. अश्नीरच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सोशल मीडिया युजर्सवर शाेककळा पसरली आहे. अशात अश्नीरची सोशल मीडिया पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारत पेचे एक्स को-फाउंडर अश्नीर ग्रोव्हर (ashneer grover) त्यांच्या वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी शेअर करत म्हणाला, ‘बाय पापा, तुमच्यावर प्रेम आहे. स्वर्गात पापाजी, मोठ्या मम्मी, आजोबा आणि आजीची काळजी घ्या. अशोक ग्रोव्हर (नंद लाल ग्रोव्हर) 04.09.1953 – 28.03.2023’. अश्नीरचे वडील अशोक ग्रोव्हर चार्टर्ड अकाउंटंट होते.  अशात त्यांच्या मृत्यूची कारण अद्याप समाेर आलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashneer Grover (@ashneer.grover)

अश्नीर ग्रोव्हरच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्रतिक्रिया देत सोशल मीडिया युजर्स अशोक ग्रोव्हर यांच्या मृत्यू प्रकरणी शोक व्यक्त करत आहेत. (ashneer grover father ashok grover passed away at age 69)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“पाकिस्तानमध्ये नाही तर भारतात मिळते प्रेम” पाकिस्तानमधील ‘या’ अभिनेत्रीने सांगितले सत्य

VIJAY VIKRAM SINGH: नैराश्याचा सामना, दारूचे व्यसन, गंभीर आजार आदी गोष्टींवर मात करत बनले ‘बिग बॉसचा आवाज’

हे देखील वाचा