Thursday, September 28, 2023

एकत्र दिसल्या आमिरच्या दोन्ही एक्स पत्नी; नेटकरीही म्हणाले, ‘आमिरशी घटस्फोट घेतल्यानंतर दोघी…’

अभिनेता आमिर खान याची गणना बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये होते. आमिर कधी त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे, तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा त्याच्या एक्स पत्नींमुळे चर्चेचा धनी ठरला आहे. आमिरने दोन वेळा लग्न केले असून त्याने दोन्ही पत्नींना घटस्फोट दिला आहे. सध्या चर्चा रंगल्या आहेत की, आमिर ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिला डेट करत आहे. अशातच आमिरच्या दोन्ही पत्नी रीना दत्ता आणि किरण राव एका कार्यक्रमात एकत्र स्पॉट झाल्या आहेत. दोघींचाही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

खरं तर, आमिर खान (Aamir Khan) याचा भाऊ मन्सूर खान (Mansoor Khan) याचे पुस्तक ‘वन: द स्टोरी ऑफ द अल्टीमेट मिथ’चे लाँच इव्हेंट होता. यामध्ये आमिर खानच्या दोन्ही एक्स पत्नी (Aamir Khan’s ex-wives) हजर होत्या. इव्हेंटदरम्यान रीना दत्ता आणि किरण राव (Reena Dutta And Kiran Rao) एकसोबत हसताना आणि बोलताना दिसल्या. दोघींनी एकसोबत कॅमेऱ्यावर पोझही दिले.

या लूकमध्ये स्पॉट झाल्या रीना आणि किरण
पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान रीना दत्ता (Reena Dutta) निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिने चंदेरी रंगाचे कानातले घातले होते आणि खांद्यावर हिरव्या रंगाची बॅग होती. तसेच, किरण राव (Kiran Rao) हिने निळ्या आणि हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली. दोघीही यावेळी खूपच सुंदर दिसत होत्या. व्हायरल व्हिडिओत दोघींना एकत्र पाहून नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

एकाने कमेंट करत लिहिले की, “आमिरशी घटस्फोट घेतल्यानंतर दोघी किती खुश आहेत.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “आमिर खानच्या किती पत्नी आहेत?” आणखी एकाने असे लिहिले की, “एक्स वाईफ क्लब.” एक चाहता असेही म्हणाला की, “आता तिसरीची बारी आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तब्बल 16 वर्षांचे होते आमिर-रीनाचे नाते
आमिर खान याचे पहिले लग्न रीना दत्ता हिच्यासोबत 18 एप्रिल 1986 रोजी झाले होते. दोघांना मुलगी इरा खान आणि मुलगा जुनैद खान आहेत. या जोडप्याने 16 वर्षे नात्यात राहिल्यानंतर 2002मध्ये आपले मार्ग वेगळे केले होते.

परस्पर संमतीने घेतला घटस्फोट
आमिर सन 2005मध्ये किरण राव हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला होता. दोघांनाही आझाद नावाचा मुलगाही आहे. आमिर आणि किरण यांनी एकमेकांना 15 वर्षे दिले. मात्र, दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर दोघांनी 2021मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

फातिमा सना शेखला डेट करतोय आमिर खान?
सध्या असे वृत्त समोर येत आहे की, आमिर आता अभिनेत्री फातिमाला डेट करत आहे. फातिमाने ‘दंगल’ सिनेमात आमिरची मुलगी गीता फोगाटचे पात्र साकारले होते. दोघे नेहमी एकत्र स्पॉट होतात. त्यामुळे असे वृत्त समोर येत आहे की, दोघेही रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार आहेत. (Actor aamir khan ex wives reena dutta and kiran rao spotted together in mansoor khan book launch event see video)

महत्त्वाच्या बातम्या-
नॉर्मल वाटलो का! भोजपुरी सुपरस्टारच्या ताफ्यात आलिशान कारची एन्ट्री, टॉप स्पीड 240 किमी; किंमत…
‘राखी सावंत कधीच बनू शकत नाही आई’, आदिलच्या दाव्याची अभिनेत्रीने पुराव्यासकट खोलली पोल; वाचा

हे देखील वाचा