‘केजीएफ २’च्या रिलीझच्या दिवशी होणार धमाका, जाणून घ्या आमिरने का मागितली ‘रॉकी भाई’ची माफी?


बॉलिवूड अभिनेता आमिर खानने काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. हा चित्रपट आता १२ एप्रिल, २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा मेगा बजेट चित्रपट ‘केजीएफ २’ देखील प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाची टक्कर यशच्या ‘केजीएफ २’ या चित्रपटाशी होणार आहे. दोन्ही चित्रपट एकमेकांना भिडवण्यासाठी आमिरने यशची माफी मागितली आहे.

बॉक्स ऑफिसवर दोघांची होणार टक्कर
यशच्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘केजीएफ २’ च्या प्रदर्शनाची तारीख आधीच निश्चित केली होती. आता आमिरनेही आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख त्याच दिवशी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “इतर निर्मात्यांनी निश्चित केलेली तारीख मी कधीही निवडत नाही. कारण, या चित्रपटात मी एका शीखची भूमिका करत आहे, म्हणूनच आम्ही ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बैसाखीच्या दिवशी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.”

आमिर खानने का मागितली यशची माफी?
आमिर म्हणाला की, “या घोषणेपूर्वी मी ‘केजीएफ २’चे निर्माते आणि अभिनेता यशची माफी मागितली आहे. ‘लाल सिंग चड्ढा’च्या प्रदर्शनासाठी १४ एप्रिल ही सर्वात योग्य तारीख का आहे, हे मी त्यांना समजावून सांगितले. त्यांनी माझा मुद्दा समजून घेतला आणि माझ्या मुद्द्याशी सहमत झाले.” आमिरचा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे.

कोव्हिडमुळे प्रदर्शनाची डेट ढकलली पुढे
कोव्हिडमुळे चित्रपटाच्या शूटिंगला सातत्याने विलंब होत आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ नंतर आमिरचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकेल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एफआयआर दाखल केल्याची माहिती देताना कंगनाने शेअर केला तिचा बोल्ड फोटो

-‘या’ कारणामुळे कपिल शर्माच्या शोमध्ये सामील न होताच दिल्लीला परतल्या स्मृती इराणी, कॉमेडियनने मागितली माफी

-बॉलिवूडची सर्वात यशस्वी स्क्रिप्ट रायटरची जोडी ‘सलीम – जावेद’ तुटली तरी कशी, जाणून घ्या


Latest Post

error: Content is protected !!