Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन या परप्रांतीयांना घरातून हुसकावून दे महाराजा; अभिजित केळकरची बिग बॉसच्या सदस्यावर संतापजनक पोस्ट…

या परप्रांतीयांना घरातून हुसकावून दे महाराजा; अभिजित केळकरची बिग बॉसच्या सदस्यावर संतापजनक पोस्ट…

बिग बॉस मराठी मध्ये  सध्या सर्व सदस्यांना दोन चिमुकल्या सदस्यांना सांभाळण्याचा टास्क देण्यात आला आहे. या टास्क मध्ये दोन टीम पाडण्यात आल्या आहे. प्रत्येक टीमला या बाळांना सांभाळायचं आहे, सिझनच्या तिसर्या आठवड्यात हा आगळा वेगळा टास्क पार करायची जबाबदारी सर्व सदस्यांना देण्यात आली आहे. हा टास्क करताना काही नियम देखील घालून देण्यात आले यापैकी एक नियम आहे तो म्हणजे सर्व सदस्यांना या बाळांशी फक्त मराठीतच संवाद साधता येनार आहे. 

या टास्क दरम्यान अंकिता बाळाशी मालवणी भाषेत संवाद साधताना दिसली. त्यावेळी वैभव तिला म्हणतो, मालवणी हि मराठी भाषा नाही. आता वैभव या गोष्टीवरून ट्रोल होतोय.वैभवच्या या विधानावर नेटकरी नाराज आहेत.अभिनेता अभिजित केळकर याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट शेयर करताना दिसला.

या पोस्ट मध्ये अभिजित म्हणतो, कोण आहेत हे लोक आणि नक्की कुठल्या राज्यातून आले आहेत? हे लोक खरे परप्रांतीय आहेत ज्यांना मालवणी भाषा मराठी भाषा वाटत नाही, ते लोक स्वतः मराठी म्हणून जी भाषा वापरतात ती भाषा धेडगुजरी मराठी म्हणून आम्ही चालवून घेतोच आहोत की… देवा महाराजा, ह्यांका बिग बॉसच्या घरातून हुसकून भायेर काड आनी मालाडच्या मालवणीत नेऊन सोड महाराजा, व्हय महाराजा..

अभिजीतची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरते आहे. नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान, घरातील या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी सदस्यांवर आहे. आता सदस्य ही जबाबदारी कशी पार पडतात हे बघणे रंजक ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

पुनरागमनाची तयारी करतेय ईशा देओल ! विक्रम भट्टच्या सिनेमातून परतणार मोठ्या पडद्यावर…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा