Friday, April 19, 2024

‘ज्याने देशाला हसवलं, तोच आज…’, राजूंच्या निधनावर ‘कॉमेडी किंग’ सुनील ग्रोव्हरही झाला दु:खी

मागील 41 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) मालवली. त्यांनी वयाच्या 58व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. ते ‘गजोधर भैय्या’ म्हणूनही ओळखले जायचे. त्यांच्या निधनानंतर आख्खा देश शोकसागरात बुडला आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहत आहेत. यामध्ये काही कलाकारांचाही समावेश आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर यानेही राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राजू यांच्या निधनामुळे सुनील ग्रोव्हर भावूक
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या निधनाच्या वृत्ताने प्रत्येकजण दु:खात आहे. आपल्या धमाल कॉमेडीने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी दीर्घ काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशात त्यांच्या जाण्याने सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) हादेखील दु:खी झाला आहे. राजूच्या निधनाबद्दल सुनील ग्रोव्हर याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

सुनील ग्रोव्हरने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये राजूंचा एक फोटोही दिसत आहे. या फोटोसोबत सुनीलने लिहिले आहे की, “तुमच्या आत्म्याला शांती मिळो राजू श्रीवास्तव जी. तुम्ही संपूर्ण देशाला हसवले आहे. आज हा क्षण खूपच दु:ख देणारा आहे की, तुम्ही इतक्या लवकर जगाला सोडून गेलात. माझ्या संवेदना तुमच्या कुटुंबासोबत आहेत.” अशाप्रकारे सुनीलने राजू यांना भावूक श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

एका कॉमेडी किंगने दुसऱ्या कॉमेडियन म्हटले ‘अलविदा’
भारताच्या सर्वोत्तम कॉमेडियनबद्दल जेव्हाही चर्चा होईल, तेव्हा- तेव्हा त्यामध्ये राजू श्रीवास्तव यांचे नाव आल्याशिवाय राहणार नाही. राजू यांच्या निधनामुळे कलाविश्व दु:खात आहे. ज्याप्रकारे सुनील त्याच्या कॉमेडीसाठी ओळखला जातो, त्याच्यापेक्षाही जास्त चर्चा राजू यांच्या कॉमेडीची व्हायची. अशात आता एका दिग्गज कॉमेडियनच्या जाण्याने दुसऱ्या कॉमेडी किंगलाही दु:ख झाले आहे.

राजू हे फक्त कॉमेडीपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांनी अभिनयातही आपला दम दाखवू दिला होता. त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यामध्ये सलमान खान, अनिल कपूर, शाहरुख खान आणि ऋतिक रोशन यांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘दुःखी लोकांना हसण्याची दैवी देणगी देणाऱ्या सिकंदरला अखेरचा सलाम’, राजूंच्या निधनावर दिग्गज कवी भावूक
मोठी बातमी! स्वातंत्र्यसैनिकाच्या बायोपिकमधून मांजरेकर बाहेर, दिग्दर्शन न करण्यामागील कारण आले समोर
राजूंच्या निधनानंतर पूर्ण खचून गेलीये पत्नी; म्हणाली, ‘मी बोलण्याच्या स्थितीत नाही, एवढंच सांगते…’

हे देखील वाचा