×

Mahashivratri 2022 | आशुतोष राणा यांनी गायले ‘शिव तांडव’, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

हिंदी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक मानले जाणारे आशुतोष राणा (Ashutosh Rana) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ते अनेक व्हिडिओ आणि कविता शेअर करत असतात. अभिनयासोबतच आशुतोष राणा यांच्या हिंदी भाषेतील अनेक कवितांचे सुद्धा खूप कौतुक केले जाते. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आशुतोष राणा यांनी सोशल मीडियावर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते शिव तांडव गाताना दिसत आहेत.

हिंदी चित्रपट क्षेत्रात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांच्या अभिनयाचीच नव्हे, तर प्रतिभावान दमदार वत्कृत्वशैलीचीही नेहमीच चर्चा केली जाते. यामध्ये अभिनेते आशुतोष राणा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी आपल्या आवाजात गायलेले एक गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आशुतोष राणा यांनी महाशिवरात्रीला भगवान शंकराला वंदन केले आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “प्रिय आलोक श्रीवास्तव यांनी त्याच लयीत आणि लयीत शिव तांडव स्तोत्राचा हिंदीत केलेला सोपा अनुवाद नक्कीच करोडो भक्तांच्या आनंदाचे कारण बनेल. जगात प्रचलित असलेल्या विकृतींचा नाश करून निसर्गाचे रक्षण व संवर्धन करावे, हीच महादेवाला प्रार्थना आहे. हर हर महादेव!”

आशुतोष राणा यांचा हा व्हिडिओ समोर येताच तुफान व्हायरल झाला आहे. चाहते याला खूप पसंत करत आहेत आणि सोशल मीडियावर खूप शेअर करत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आशुतोष राणा नुकतेच ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ या वेब सीरिजमध्ये दिसले होते, ज्यामध्ये त्यांच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. आता ते लवकरच ‘शमशेरा’, ‘पठाण’ आणि ‘पृथ्वीराज’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा – 

Latest Post