Thursday, April 25, 2024

प्रेयसीसमोरच बेडरुममधील परवीन बाबी यांचे ‘ते’ धक्कादायक वागणे डॅनी डेन्जोंगपा यांना प्रचंड खटकले होते!

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते म्हणजेच डॅनी डेन्जोंगपा हे आज (२५ फेब्रवारी) रोजी त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलीवूडमध्ये क्रूर खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले डॅनी खऱ्या आयुष्यात मात्र एक गायक, संगीतकार, लेखक, चित्रकार आणि मुख्य म्हणजे एक संवेदनशील व्यक्ती आहेत. डॅनी यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४८ साली सिक्कीममध्ये झाला. त्यांचे खरे नाव फैंटसो त्शेरिंग डेन्जोंगपा असे आहे. त्यांना डॅनी हे नाव जया बच्चन यांनी दिले आहे.

डॅनी यांनी हिंदीसोबतच नेपाळी, तामिळ, तेलुगु आणि हॉलीवुड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात नेपाळी चित्रपटापासून केली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मानत चीड निर्माण केली.

साधारण ८०,९० च्या दशकात त्यांनी रंगवलेले खलनायक आणि प्रभावी अभिनय चित्रपटांची ओळख बनले होते. डॅनी यांनी चित्रपटांमध्ये तुफान यश मिळवले. एकीकडे चिरपटांमध्ये ते यशाची एक एक पायरी चढत असताना दुसरीकडे त्यांच्या खऱ्या आयुष्यात प्रेम देखील फुलत गेले. त्यांची आणि परवीन बाबी यांची प्रेमकहाणी त्याकाळी सर्वांच्याच चर्चेचा विषय होती.

चला तर मग डॅनी डेन्जोंगपा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांची आणि परवीन बाबी यांची प्रेमकहाणी…

त्याकाळची टॉप अभिनेत्री असणाऱ्या परवीन बाबी आणि लोकप्रिय खलनायक असणारे डॅनी यांची लव्हस्टोरी सुमारे चार वर्ष चालली. त्यानंतर त्यांनी सामंजस्याने ब्रेकअप देखील केले. डॅनी यांनी फिल्मफेयर या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी परवीन बाबी आणि त्यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते.

या मुलाखतीमध्ये सांगताना ते म्हणाले, “त्यावेळी आम्ही तरुण होतो. समजुतदार होतो. जवळपास चार वर्षे आम्ही एकत्र होतो. आमच्या नात्याविषयी इंडस्ट्रीमध्ये खूप चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतरच्या काळात आमच्या नात्यात दुरावा आला, मात्र, तरीही आमची मैत्री मात्र कायम टिकून राहिली. आमचे ब्रेकअप झाल्यानंतर परवीन कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. असे असूनही ती मला अनेकदा तिच्या घरी जेवायला बोलवायची.” त्यावेळी डॅनी अभिनेत्री किमला डेट करत होते. पण, परवीनच्या वागण्यामुळे त्यांच्या आणि किमच्या नात्यात बराच तणाव निर्माण झाला होता.

पुढे डॅनी म्हणाले, “परवीन माझ्या घरी येऊन अगदी मोकळेपणाने वावरत असायची. एकदा तर मी माझ्या प्रेयसीला घरी घेऊन आलो तेव्हा परवीन माझ्या बेडरुममझ्ये वीसीआरवर चित्रपट पाहात बसली होती. त्यावेळी माझ्या प्रेयसीला तिचे हे वागणे बिलकुल आवडले नव्हते. परवीन मात्र नेहमी आपण तर फक्त मित्रच आहोत, असे म्हणायची.”

परवीन यांच्या आजाराबद्दल सांगताना ते म्हणाले, “परवीनच्या वागण्यात होणारे बदल त्यावेळी मी सुद्धा बघत होतो. ती आजारी असताना महेश भट्ट यांनी मला तिच्या परिस्थितीविषयी माहिती देऊन तिला आधार देण्यासाठी मी जावे असे सांगितले. परवीनला जेव्हा जेव्हा माझी गरज होती, तेव्हा तेव्हा मी तिच्यासाठी त्या ठिकाणी हजर होतो.”

डॅनी आणि परवीन यांचे नाते संपूनही एक अंधुक धागा त्यांना बांधून होता. परवीन यांच्या अंत्ययात्रेला डॅनी गेले होते. एकेकाळी हिंदी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री असलेल्या परवीन यांचा अंत अतिशय वाईट झाला.

हे देखील वाचा