गोविंदाचे नवीन ‘हॅलो’ गाणे रिलीझ, व्हिडिओ पाहून चाहत्यांनी अभिनेत्याला दिला ‘हा’ सल्ला

गोविंदा (Govinda) हा ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता आहे. ज्याने आपल्या कॉमेडी आणि डान्स स्टाईलने सर्वांना वेड लावले आहे. एक काळ असा होता की, प्रेक्षक त्याचे चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत असत. तो बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत असे. गोविंदाने खूप दिवसांपासून पडद्यावर आपली जादू दाखवली नसली, तरी त्याने कधीही हार मानली नाही. सध्या तो गाण्यात नशीब आजमावताना दिसत आहे.

नुकताच त्याचा एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. ज्याचे नाव आहे ‘टिप टिप पानी बरसा’ आहे. या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. हे गाणे स्वत: गोविंदाने गायले असून, व्हिडिओमध्ये तो जबरदस्त डान्सही करताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा त्याच जोमात गोविंदने त्याचा दुसरा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे, ज्याचे नाव ‘हॅलो’ आहे.

गोविंदाला चाहत्यांनी दिला सल्ला
हे गाणे सुद्धा गोविंदानेच गायले आहे आणि व्हिडिओमध्ये देखील तो शानदार परफॉर्म करताना दिसत आहे. हे गाणे गोविंदानेच लिहिले आहे. गाणे ऐकून कोणीही आनंदी होऊ शकतो. या गाण्यात गोविंदाची क्लासिक स्टाईल पाहायला मिळते, जे पाहून त्याच्या चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. काही वेळापूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणे गोविंदाच्या चाहत्यांनाही खूप आवडते. जेव्हा गोविंदाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याच्या प्रदर्शनाची माहिती दिली. तेव्हा चाहत्यांनी त्याला सल्ले देण्यास सुरुवात केली. गोविंदाच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना चाहत्यांनी लिहिले की, “तुमच्यासाठी गाणे बनवण्यापेक्षा वेब सीरिज बनवणे चांगले.”

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

गोविंदा आहे सदाबहार अभिनेता
गोविंदाने ८० आणि ९०च्या दशकात पाहिलेले स्टारडम हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न आहे. गोविंदा हा त्याच्या काळातील असा अभिनेता होता, ज्याची फॅन फॉलोविंग प्रत्येक विभागातील प्रेक्षकांमध्ये होती. गोविंदा हा मास आणि क्लास अशा दोन्ही श्रेणींचा अभिनेता मानला जात असे. बाकी स्टार्सपेक्षा वेगळा अभिनेता म्हणून गोविंदाची ओळख होती. त्याची स्वतःची एक वेगळी स्टाईल होती, ज्यामुळे तो इतर कोणत्याही सुपरस्टारपेक्षा वेगळा होता. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये अनेक ऍक्शन, रोमँटिक हिरो येऊ शकतात, पण गोविंदाची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे अनेकदा बोलले जाते.

हेही वाचा :

Latest Post