अनेक कलाकार त्यांच्या प्रोजेक्ट संदर्भात परदेशात जाणे पसंत करतात. मात्र, अनेकवेळा असे देखील होते की, कलाकार वर्षानुवर्षे परदेशी राहिल्याने त्यांच्या चाहत्यांना त्यांचा विसर पडतो. हरीश पटेल हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. हरीश भारत सोडून यूकेमध्ये शिफ्ट झाले आहेत. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांमधील त्यांची सक्रियता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत हरीश आता या जगात नाहीत, असे अनेकांना वाटू लागले आहे.
ट्रेलर पाहिल्यानंतर चर्चा झाली सुरू
एका मुलाखतीदरम्यान हरीश म्हणाले की, “जेव्हा लोकांनी माझ्या ‘इटर्नल्स’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, तेव्हापासून माझ्याबद्दल चर्चा सुरू झाली. अचानक मी लोकांच्या नजरेत आलो. मी या जगात राहिलोच नाही, असा समज पूर्वी लोकांनी केला होता.” हरीश पुढे सांगतात की, “मला असे वाटते की, लोकांनी हे मान्य करण्यापूर्वी मला येऊन विचारले का नाही? चला, हरीश पटेल गेला, मेला की जिवंत, हे गुगलवर शोधले असते. कारण, मी इथे काम करत नव्हतो किंवा दिसत नव्हतो, मग बोलले मी राहिलोच नाही.”
हरीश यूकेमध्ये करत आहे थिएटर
हरीश १९९८ मध्ये आलेल्या ‘गुंडा’ या चित्रपटात हिबू हातेलाच्या भूमिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. हरीश यूकेमध्ये आपली जमीन शोधत आहेत. तिथल्या जीवनाबद्दल हरीश सांगतात की, “मला इथलं पहिलं प्रेम जिवंत करण्याची संधी मिळाली, ते म्हणजे थिएटर. मी खेळायचो, माझे राफ्ता राफ्ता हे नाटक रॉयल नॅशनल थिएटरमध्ये खूप लोकप्रिय होते. त्यानंतर मी तिथल्या अनेक टीव्ही शोचा भाग बनलो.”
आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट बघून शोधू लागले लोक
हरीश यांना आश्चर्य वाटते की, त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टनंतर अचानक लोक त्यांना शोधू लागले आहेत. हरीश सांगतात, “१४ वर्षांनंतर लगेचच लोकांचे माझ्यावर इतके प्रेम आले आणि लोक येऊन मला सांगू लागले की, तू मला आधी का सांगितले नाहीस. मलाही वाटले की, आधी लोकांना त्याबद्दल माहिती द्यावी, पण मग काय गंमत आहे, माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांनी खूप मेहनत करायला हवी होती.”
एक्सप्लोर करण्याची आहे आवश्यकता
आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टबद्दल हरीश म्हणतात, “जग खूप मोठे आहे. तू किती दिवस कपचा भाग राहणार आहेस? बाहेर जा आणि पाहा, लोकांना त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत, तर घरी रिकामे बसू, असा विचारही लोकांनी करणं सोडून द्यावं.”
कोव्हिडमुळे प्रीमियरला उपस्थित राहू शकलो नाही
हरीश कोरोना पॉझिटिव्ह असल्याने इटर्नल्सच्या प्रीमियरला उपस्थित राहू शकले नाहीत. याबद्दल हरीश म्हणाले की, “मी किती निराश झालो हे मी व्यक्त करू शकत नाही, पण तरीही मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला इतक्या मोठ्या चित्रपटाचा भाग बनण्याची संधी मिळाली.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
हरीश यांनी ‘गुंडा’, ‘मिस्टर इंडिया’, ‘घातक’, ‘शोला और शबनम’, ‘प्यार तो होना ही था’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एफआयआर दाखल केल्याची माहिती देताना कंगनाने शेअर केला तिचा बोल्ड फोटो
-बॉलिवूडची सर्वात यशस्वी स्क्रिप्ट रायटरची जोडी ‘सलीम – जावेद’ तुटली तरी कशी, जाणून घ्या










