Wednesday, February 19, 2025
Home बॉलीवूड कपिल शर्माची चालली जादू! ‘या’ गोष्टीत सलमान खानला मागे टाकत आला पहिल्या क्रमांकावर

कपिल शर्माची चालली जादू! ‘या’ गोष्टीत सलमान खानला मागे टाकत आला पहिल्या क्रमांकावर

हिंदी टेलिव्हिजनच्या सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता सलमान खानला (Salman Khan) दुसरे स्थान मिळाले आहे. कपिल शर्माने (Kapil Sharma) पहिल्या स्थानावर येऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ऑरमॅक्स मीडियाने ही यादी जाहीर केली आहे. सध्या कपिल लोकप्रियतेत सलमान आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांसारख्या सेलिब्रिटींच्या पुढे दिसत आहे. साहजिकच त्याला ही लोकप्रियता त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ या लोकप्रिय शोमुळेच मिळाली.

ऑरमॅक्स मीडियाने सोशल मीडियावर टॉप ५ ‘मोस्ट पॉप्युलर नॉन-फिक्शन पर्सनॅलिटी’ची यादी शेअर केली आहे. त्यांनी ट्वीट केले की, “हिंदी टेलिव्हिजनमधील सर्वात लोकप्रिय नॉन-फिक्शन व्यक्तिमत्त्व (डिसेंबर २०२१).” ही अशी व्यक्तिमत्त्वे आहेत ज्यांना हिंदी टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे.

‘बिग बॉस १५’ च्या ‘या’ जोडीलाही यादीत मिळाले स्थान
या यादीत कपिलला पहिले स्थान मिळाले आहे. तर सलमानला दुसरे स्थान मिळाले. अमिताभ तिसऱ्या स्थानावर आहेत, तर ‘बिग बॉस १५’ ची प्रसिद्ध जोडी तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. कपिलने लोकप्रियतेच्या बाबतीत सलमानसारख्या कलाकाराला मागे टाकत सर्व प्रेक्षकांना चकित केले आहे.

मेगास्टार अमिताभ बच्चन आहेत तिसऱ्या क्रमांकावर
ऑरमॅक्स रेटिंग एजन्सीने काल १६ डिसेंबर रोजी ही यादी ट्वीट केली होती. अमिताभ यांच्यासारखे मेगास्टार तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जे त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे चर्चेत राहिले. या यादीत आपल्या आवडत्या कलाकारांना पाहून नेटकरी रोमांचित झाले आहेत.

नेटकऱ्यांनी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यावर दाखवले प्रेम
या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट करून आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले की, “अरे देवा! पॉवर कपल. तेजरन.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “आनंद आहे तसेच चिडचिडही आहे. करण एक भावना आहे.” मात्र काही नेटकरी ऑरमॅक्स मीडियाच्या रेटिंगवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा