Thursday, March 28, 2024

‘माझे नव्हे, तर तिचे अफेअर होते…’, करण मेहराने पत्नी निशा रावलबद्दल केला मोठा खुलासा

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता करण मेहराने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नैतिकची भूमिका साकारून घराघरात आपली ओळख निर्माण केली. त्याची पत्नी निशा रावलने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचारासाठी एफआयआर दाखल केला होता. तर करणने हे सर्व आरोप फेटाळले होते. यासोबतच निशा रावलने तिच्या पतीवर अतिरिक्त वैवाहिक संबंध असल्याचा आरोप देखील केला होता. मात्र, आता त्याच्या मुलाखतीत करण म्हणाला की, त्याच्याऐवजी २०१५ मध्ये निशाचे अफेअर होते. यासोबतच करणने निशाने मागितलेल्या पोटगीबद्दलही सांगितले.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत करण मेहरा म्हणाला की, त्याचे कधीही कोणाशी अफेअर नव्हते. त्याने सांगितले की, त्याच्या पत्नीचे २०१५ मध्ये विवाहबाह्य संबंध होते, जे २०१६ पर्यंत टिकले. करण असेही म्हटला की, निशा रावलचा भाऊ रोहित सेठियानेही आपल्या मोठ्या बहिणीला तिच्या खूप मोठ्या चुकीबद्दल माफ करण्याची हात जोडून विनंती केली. तो पुढे म्हणाला, “त्यानंतर मी तिला माफ केले. मी सर्व काही केले. हा रोहित सेठिया माझ्या समोर उभा होता आणि माझ्या बहिणीचे आयुष्य खराब होईल अशी माफी मागत होता. तिने चूक केली आहे, माझी आणि माझ्या आईची इज्जत काय राहील, असे म्हणत होता.”

त्याच मुलाखतीत, करण मेहराने पोटगीबद्दल सांगितले की, “निशा रावलने एक खूप मोठ्या रकमेची पोटगी मागितली होती. ज्यामध्ये ५० मुले सांभाळू शकले असते.” त्यावर तो तिला म्हणाला की, “मी तुला पैसे का देऊ? त्याला सांभाळण्यासाठी? अशा व्यक्तीसोबत तर मूल अजिबात सुरक्षित नाही.”

निशा रावल आणि करण मेहरा यांच्या नात्याबद्दल बोलायचं झालं, तर हे दोघे टीव्ही जगतातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. दोघांनीही अनेकदा त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. पण, जेव्हा निशाने या वर्षी जूनमध्ये करणविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला, तेव्हा त्यांच्यातील सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

-शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते २८ टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

-‘कसं काय पावनं बरं हाय का?’ मृण्मयीने शेअर केला आदिनाथसोबतचा दिलखेचक फोटो

हे देखील वाचा