नादच खुळा! खेसारी अन् राणीच्या गाण्याचा रिलीझ होताच धुमाकूळ, मिळाले ‘इतके’ लाख व्ह्यूज


भोजपुरी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते असे आहेत, जे आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या गाण्यांमुळेही चर्चेचा विषय ठरतात. यापैकीच एक आहे अभिनेता खेसारी लाल यादव. खेसारीचा कोणताही नवीन म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होताच धमाल करत असतो. त्यामुळे त्याला ‘ट्रेंडिंग स्टार’ असेही म्हटले जाते. अशामध्ये त्याने ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध केली आहे की, त्याला ‘ट्रेंडिंग स्टार’ का म्हणतात. खेसारीचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याने प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे.

खेसारीच्या नवीन गाण्याचे नाव ‘सईया के रोटी’ असे आहे. हे गाणे एस४यू या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्याला एकाच दिवसात २४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Actor Khesari Lal Yadav Bhojpuri Song Saiyan Ke Roti Video Gone Viral)

विशेष म्हणजे एस४यू हा युट्यूब चॅनेल खेसारीचा मित्र आणि भोजपुरी अभिनेता तसेच माजी आमदार संजय यादव यांचा आहे. संजय यांनी या चॅनेलवर गाणे प्रदर्शित करताना म्हटले होते की, हा चॅनेल एकापेक्षा एक गाणे घेऊन येईल. मात्र, त्यावेळी त्यांना अपेक्षा नव्हती की, त्यांच्या चॅनेलवरील कोणत्याही गाण्याला एकाच दिवसात लाखो व्ह्यूज मिळतील. असे असले, तरीही खेसारी आणि अनुपमा यादव यांच्या आवाजातील ‘सईया के रोटी’ या गाण्याने ही कामगिरी करून दाखवली आहे.

हे गाणे खेसारी आणि अभिनेत्री राणीवर चित्रीत करण्यात आले आहे. या व्हिडिओ गाण्यातील अभिनेता शानदार लूक आणि स्टाईलमध्ये दिसत आहे. त्याची देसी स्टाईलही वाखाणण्याजोगी आहे. अभिनेत्री वेस्टर्न स्टाईलमध्येही कमालीची दिसत आहे.

खेसारीच्या या गाण्यात अभिनेत्री राणीसोबतची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्याचे बोल आणि संगीत तुम्हालाही थक्क करेल. खेसारी आणि अनुपमा यादव यांनी आपल्या उत्तम आवाजाने हे गाणे सजवले आहे. या गाण्याचे बोल विशाल भारती यांनी लिहिले आहेत. संगीत दिग्दर्शक आर्य शर्मा आहेत. या व्हिडिओचे दिग्दर्शन पवन पाल यांनी केले आहे, तर निर्माता संजय यादव आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकदम झक्कास! अभिनेत्री नीलम गिरीने दुबईच्या रस्त्यावर दाखवले लटके-झटके, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

-‘स्कूल गर्ल’च्या प्रेमात हरवलाय भोजपुरी स्टार राकेश मिश्रा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही आठवेल पहिले प्रेम

-सपना चौधरीने पती वीर साहूची खोलली पोल, सांगितले, ‘सवा शेर’सोबत कशी असते सकाळ


Latest Post

error: Content is protected !!