Tuesday, July 23, 2024

दारा सिंग यांच्यासोबत दिसणाऱ्या चिमुकल्याला ओळखलं का? बनलाय सुपरस्टार, एका सिनेमातून छापतो 100 कोटी

सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये आता आणखी एका कलाकाराचा फोटो व्हायरल होतोय. या फोटोत दारा सिंग यांच्यासोबत दिसणारा मुलगा मोठा होऊन बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे. त्याने ऍक्शन हिरो म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याला ‘खिलाडी’ म्हणूनही ओळखले जाते. त्याने अनेक रोमँटिक सिनेमातही काम केले आहे. तसेच, माधुरी दीक्षित, रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी यांच्यासोबत 1990च्या दशकातील सर्व प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत त्याने काम केले आहे. विशेष म्हणजे, तो बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार असलेल्या अभिनेत्याचा जावई आहे आणि त्याची पत्नीही सुप्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे.

आता एवढं वर्णन केल्यानंतर चाहत्यांनाही समजले असेल की, आम्ही कुणाबद्दल बोलत आहोत. आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, तो इतर कुणी नसून अक्षय कुमार (Akshay Kumar) आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोत दारा सिंग (Dara Singh) यांच्यासोबत दिसणारा मुलगा अक्षय कुमार आहे. अक्षयचे नाव बॉलिवूडमधील अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले. मात्र, त्याने भारतीय सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या लेकीसोबत म्हणजेच ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिच्यासोबत 2001मध्ये लग्न केले.

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील असा एकमेव अभिनेता आहे, ज्याचे वर्षाकाठी 4-5 सिनेमे प्रदर्शित होतात. तो बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. एकीकडे कलाकारांचे स्टारडम काळानुसार कमी होत जाते, पण अक्षयचे स्टारडम काळानुसार वाढतच जात आहे. विशेष म्हणजे, त्याचे एका सिनेमासाठीचे मानधनही चांगलेच वाढत आहे. तो एका सिनेमासाठी तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयने त्याच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो कधी ऍक्शन हिरोची भूमिका साकारतो, तर कधी रोमँटिक सिनेमात काम करून चाहत्यांची मने जिंकतो. यासोबतच तो त्याच्या कॉमेडीने प्रत्येकाला पोट धरून हसायला भाग पाडतो. अक्षय कुमारच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा 2022मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रक्षाबंधन’ या सिनेमात झळकला होता. आता तो आगामी काळात ‘कठपुतली’, ‘गोरखा’, ‘हाऊसफुल 5’ यांसारख्या सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणबीरच्या ‘या’ 5 चित्रपटांनी पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई, ‘ब्रह्मास्त्र’ मोडेल का रेकॉर्ड?
आगमन गणपत्ती बाप्पांचं! ‘ही’ गाणी वाजलीच पाहिजेत
रोमांन्स, सस्पेंन्सचा थरार! चुकूनही पाहायला चुकवू नका ‘या’ पाच वेबसिरीज

हे देखील वाचा