Friday, April 19, 2024

‘फार नाही किमान शंभर-पाचशे’, ‘३ इडियट्स’मधील हा अभिनेता करतोय कठीण प्रसंगाचा सामना, चाहत्यांकडे मागितली मदत

बॉलिवूडमध्ये अनेक विविध विषय असलेले चित्रपट बनले आहेत. जे अजरामर ठरले. परंतु ‘३ इडियट्स’ या चित्रपटाने मात्र चांगलाच विक्रम केला होता. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी एकत्र येऊन काम केले होते. तरुण पिढीच्या विचारांवर करीअरवर आधारलेला हा चित्रपट अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना पहिला. आमिर खान, बोमन इराणी, करिना कपूर, आर माधवन या कलाकारांनी या चित्रपट उत्तम भूमिका साकारली होती. या चित्रपटात बोमन इराणी यांच्या पर्सनल असिस्टंटची भूमिका ज्येष्ठ मराठी अभिनेते राजेंद्र पटवर्धन यांनी निभावली होती. चित्रपटात त्यांचा फारसा रोल नव्हता. तरी देखील त्यांचा अभिनय लक्षात राहावा असाच होता. या चित्रपटानंतर ते पडद्यावर फारसे दिसले नाही. मागील काही दिवसांपासून ते आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यांनी त्यांच्या चाहत्यांकडे मदतीची मागणी केली आहे.

‘मराठी नाट्य कलाकार संघ’ या फेसबुक ग्रुपवर गेल्या आठवड्यापासून एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात प्रसिद्ध राजेंद्र पटवर्धन हे आजाराने ग्रस्त आहेत, असे सांगण्यात आले आहे. त्यासोबत त्यांना नेमकं काय झालंय हे देखील सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पोस्टद्वारे त्यांनी त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची सांगितले आहे.

त्यांनी लिहिले आहे की, “मला काही बोलायचे आहे, सांगायचे आहे…मी एक साधा माणूस. व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटक केलेला पण मी सेलिब्रिटी नाही. मी एक नट, उत्तम संस्थेत काम केलेले आहे. उदा. विनय(सर) आपटे बाकी मी काही बोलणार नाही. कारण आज माझा दिवस नाही, याचे कारण आमचा एक मित्र राजू पटवर्धन (राजू पटवर्धन माझ्याबरोबर “अपराध मीच केला”, या नाटकात होते. असो!”

पुढे लिहिले की, “आत्ता तो खूप आजारी आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचा एक पाय मांडीपासून कापला गेला आहे. आता त्याचा उजवा हात देखील निकामा झाला आहे. हा आता भरारी अपंगालयात आहे, तो एकटा, अविवाहित आहे . वय साठीच्यापेक्षा जास्त. मी व माझा मित्र प्रसिध्द दिग्दर्शक,लेखक, निर्माता श्री अमोल भावे आम्ही त्याच्यासाठी पैसे गोळा करत आहोत.”

त्यांनी लिहिले की, “हे अपंगालय म्हणजे. भरारी अपंगालय. मानपाडा गाव, उंबरली रोड, साई धारा टॉवर्स, डोंबिवली पूर्व इथे आहे. गरज आहे ती आर्थिक मदतीची…आत्तापर्यंत मी, अमोल भावे, संध्या म्हात्रे, प्रसन्ना आठवले, दीपक परुळेकर, शेखर जोशी, संध्या दानव, काका हरदास व इतर अनेक मदत करत आहेतच आपणही करावी..फार नाही किमान शंभर पाचशे हजार जास्त नको!” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांचे चाहते आता त्यांना मदत करण्यास पुढे सरसावत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा