Friday, March 29, 2024

Death Anniversary | शेवटच्या काळात खिळखिळी झाली होती मधुबालांची हाडं; रडत म्हणायच्या, ‘मला मरायचे नाही…’

हिंदी चित्रपट क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने चित्रपट क्षेत्रात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या अभिनेत्रींमध्ये सर्वप्रथम मधुबाला यांचे (Madhubala) नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मधुबाला यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मधुबालांच्या चित्रपटांची आजही आपल्याला चर्चा पाहायला मिळते. आज ( २३ फेब्रुवारी) मधुबाला यांनी पुण्यतिथी जाणून घेऊ या त्यांच्याबद्दल… 

मधुबाला या बॉलिवूडच्या अप्सरा म्हणून ओळखली जायच्या. मधुबाला यांच्या सौंदर्यावर त्या काळात प्रत्येकजण फिदा झाला होता. आपल्या सौंदर्याच्या जादूने त्यांनी अनेक चित्रपट सुपरहीट केले होते. त्या काळात प्रत्येक अभिनेता त्यांच्यासोबत काम करायला आतुर झालेला असायचा. मात्र म्हणतात ना देव जितके भरभरून देतो तितकेच तो हिरावूनही घेतो .अभिनेत्री मधुबालाच्या बाबतीतही असे च झाले. यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्रीच्या आयुष्यात दुःखही प्रचंड होते .म्हणूनच त्यांना अवघ्या वयाच्या ३६व्या वर्षी जगाचा निरोप घ्यावा लागला. मधुबाला यांचा मृत्यू एका महाभयंकर आजाराने झाला, ज्यामुळे त्यांना आपल्या अखेरच्या काळात प्रचंड यातना सोसाव्या लागल्या होत्या. त्यामुळेच त्यांना तब्बल नऊ वर्षे अंथरुणाशी खिळून राहावे लागले होते.

मधुबाला यांच्या ह्रदयाला होल होते, ज्याचा खुलासा १९५४ मध्ये मद्रासमध्ये त्यांच्या ‘चालाक’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाला. या आजारपणामुळे हा चित्रपट कधीच पूर्ण होऊ शकला नाही. कारण यावेळी मधुबाला यांना रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी तीन महिने आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही त्या आपल्या कामात व्यस्त राहायला लागल्या. याबद्दलचा खुलासा मधुबालाची बहीण मधुर भूषणने केला होता.

पुढे बोलताना म्हणाल्या की, ‘मुघल ए आझम’ चित्रपटाच्यावेळी मधुबालांना साखळ्यांनी बांधले जायचे. दिवसभर त्या अशाच बांधलेल्या स्वरुपात असायच्या. मात्र जेव्हा शूटिंग पुर्ण व्हायचे तेव्हा त्यांचे हातपाय निळे पडलेले असायचे. ह्रदयाच्या आजाराने त्यांची अशी अवस्था झाली होती. याबद्दल डॉक्टरांनी त्या फक्त दोन वर्षाची सोबती असल्याचा खुलासा केला होता. मधुबाला यांना अशा अनेक आजारांनी घेरले होते. त्यांच्या शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त रक्त वाहत होते, ज्यामुळे ते नाकावाटी आणि तोंडावाटी बाहेर यायचे. याच आजारांनी त्यांचे आयुष्य आणि करियर आणि दोन्हीही संपुष्टात आले.

यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या प्रतिभावान अभिनेत्रीचा मृत्यू मात्र भयंकर झाला. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्यावर  घरीच उपचार केले जायचे. डॉक्टर घरी येऊन मधुबाला यांचे रक्त बदलायचे. त्या खूपच आजारी पडल्या होत्या. त्यांना  प्रचंड खोकला यायचा. मात्र इतके असूनही त्यांना अजून जगायचे होते. त्या डॉक्टरांना नेहमी म्हणायच्या, मला लवकर बरे करा. मात्र त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. या गंभीर आजारातच त्यांचा मृत्यू झाला.

हेही पाहा –

हे देखील वाचा