‘असा करा सुखी संसार’, रितेश देशमुखने सांगितला जेनलियाबरोबरच्या सुखी संसाराचा फॉर्मुला


रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडपे आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोवरून या जोडप्याची लोकप्रियता सहज लक्षात येऊ शकते. रितेश आणि जेनेलिया डिसूझा खासकरून त्यांच्या रोमँटिक अंदाजासाठी चर्चेत असतात. त्यांचे रोमँटिक व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होतात. पती-पत्नी दोघेही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. टिकटॉक बंद होण्यापुर्वी ते अनेक व्हिडीओ त्यावर शेअर करत असे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाच्या लग्नाला आता 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. रितेशने अलीकडेच आपल्या सुखी वैवाहिक जीवनाची काही रहस्ये सांगितली आहेत. जेनेलियाशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल बोलताना रितेशने एका मुलाखतीत सांगितले की, “हे नाते परस्पर आदरातून चालते. आम्ही दोघेही एकमेकाशी असहमत असू शकतो परंतु आम्ही एकमेकांच्या बाबतीत मर्यादा कधीच ओलांडत नाही.

रितेशच्या मते, “आदर सहजपणे संपू शकतो. आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव असल्यास आपण त्याला सहज नियंत्रित करू शकतो. पतीला त्याच्या पत्नीचा अपमान करण्याचा कोणताही अधिकार नाही.” तो पुढे म्हणाला की, “मला विश्वास आहे की सर्व अडचणी बोलण्याद्वारे सोडविल्या जाऊ शकतात.” सुरुवातीपासूनच त्या दोघांनीही आपल्या नात्यात आदर राखला आहे.

रितेश आणि जेनेलिया जवळपास 9 वर्ष नात्यात होते. दोघांनीही आपल्या अफेअरबद्दल कोणालाही कळू दिले नाही. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांनी एकमेकांशी लग्न केले. त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन पद्धतीने लग्न केले होते. ते आता दोन मुलांचे पालक आहेत. तसेच, दोघांची भेट ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या दरम्यान झाली होती. हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.