अभिनेत्री करीनाचा लाडका लेक तैमूरला लुटायचीय बँक, स्वत: वडील सैफनेच केलाय खुलासा


‘बंटी और बबली २’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचवेळी चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ दिसणार आहेत. चित्रपटाचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. सैफ अली खान आणि राणी मुखर्जी तब्बल १३ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यशराज फिल्म्सच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सैफ अली खान आणि राणी मुखर्जी गप्पा मारत आहेत. यामध्ये दोघेही त्यांचे चित्रपट, बाँडिंग आणि मुलांबद्दल बोलतात.

तैमूरला ‘तान्हाजी’मधून लागली ‘ही’ सवय
सैफने तैमूरबद्दल खुलासा करताना सांगितले की, अजय देवगणचा ‘तान्हाजी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो रागाच्या भरात बनावट तलवार घेऊन लोकांच्या मागे धावत असे. सैफचे हे बोलणे ऐकून राणी मुखर्जीला हसू आवरता आले नाही. राणी मुखर्जी म्हणते की, “तो सध्या करू शकत असलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे.” सैफ म्हणाला की, “मी त्याला नेहमी समजावत असतो की, तो एक वाईट माणूस आहे आणि ही फक्त एक भूमिका आहे.”

तैमूरला व्हायचे आहे ‘बॅड बॉय’
सैफ म्हणाला की, तैमूरला समजावूनही तो म्हणतो, “मला वाईट मुलगा व्हायचे आहे. मला बँक लुटायची आहे आणि मी सर्वांचे पैसे चोरणार आहे.” सैफचे म्हणणे ऐकून राणी मुखर्जी म्हणाली की, “तो वेगळ्या दिशेने जात आहे.” यावर सैफ म्हणतो की, “हा त्याचा एक विचार आहे पण हो. मी ते त्याच्या आईकडे सोपवतो की, तू सांभाळ.”

सैफबद्दल बोलली राणी
तैमूर हा सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मोठा मुलगा आहे. या वर्षी करीना कपूर खानने तिचा दुसरा मुलगा जेहला जन्म दिला. त्याचवेळी राणी मुखर्जीने अलीकडेच एका निवेदनात म्हटले आहे की, तिचे आणि सैफ अली खानचे बॉन्डिंग कालांतराने चांगले झाले आहे. सैफही आता चांगल्या अर्थाने बदलला आहे. आता ती सैफसोबत पालकत्वावर बोलते.

‘बंटी और बबली २’ प्रदर्शनासाठी सज्ज
राणी मुखर्जी म्हणाली की, तिच्या आणि सैफ अली खानच्या बहुतेक चर्चा तैमूर आणि आदिराशी संबंधित असतात.

मात्र, १९ नोव्हेंबरला ‘बंटी और बबली २’ प्रदर्शनासाठी सज्ज होणार असून, प्रेक्षकही या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्याची वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राणी मुखर्जीला १७ वर्षांपूर्वी किस करताना सैफ अली खान झाला होता अस्वस्थ; खुद्द अभिनेत्याने केलाय खुलासा

-लाल टिकली, नाकात नथ अन् बोटात मोठी अंगठी घालून रुपालीच्या झक्कास पोझ, पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

-मीनाक्षी शेषाद्रींनी वाढदिवसानिमित्त फोटो केला शेअर, वयाच्या ५८ व्या वर्षीही दिसतात खूपच सुंदर


Latest Post

error: Content is protected !!