×

म्हणून घटस्फोटानंतर सैफला स्वत:च्याच मुलांना भेटू देत नव्हती अमृता सिंग; मुलांचे फोटो पाहून रडायचा अभिनेता

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान आपल्या वैवाहिक जिवनामुळे नेहमीच चर्चेत असतो. पत्नी करीना कपूर खानसह त्यांचा मुलगा तैमूर याचीही नेहमीच सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळते. करीना आणि तैमूरप्रमाणेच सैफबाबत जेव्हा चर्चा होते, तेव्हा अनेकदा त्याची पहिली पत्नी अमृता सिंगचे नाव समोर येते. तसेच त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबतचे किस्सेही अनेकदा चर्चिले जातात. नुकताच सैफ आणि अमृता यांच्या घटस्फोटानंतरचा एक किस्सा सर्वांसमोर आला आहे. चला तर पाहूयात काय आहे तो किस्सा.

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंगच्या (Amrita Singh) लग्नाची जोरदार चर्चा सिनेसृष्टीत झाल्याची माहिती नेहमीच ऐकायला मिळत असते. दोघांच्याही प्रेमप्रकरणाची त्याकाळात चांगलीच चर्चा रंगली होती. दोघांनी १९९१मध्ये लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या तेरा वर्षानंतर २००४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. यावेळी त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम खान अशी दोन मुलही होती.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, घटस्फोटानंतर (Saif Ali Khan Divorce Amrita Singh) अमृताने सैफला आपल्या या दोन्ही मुलांना भेटण्यावर बंदी घातली होती. ज्यामुळे सैफ अली खान खूपच दुःखी झाला होता. इतकेच नाही, तर तो आपल्या मुलाच्या इब्राहिमच्या आठवणीत अनेकदा त्याचा फोटो पाहून रडलादेखील होता. मात्र, तरीही अमृताने मुलांना सैफपासून लांब ठेवले होते. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अमृतासोबत घटस्फोट घेतल्यानंतर सैफच्या आयुष्यात ‘रोजा’ नावाची एक मॉडेल आली होती. यावेळी ही रोजा मुलांना आपल्याबद्दल वाईट सांगेल, त्यांच्या मनात द्वेष निर्माण करेल अशी भीती अमृताला वाटत होती. म्हणून तिने सैफपासून मुलांना काही काळ लांब ठेवले होते. या काळात सैफ खूप दुःखी झाला होता, आपल्या मुलाला भेटण्यासाठी आतुर होता.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

हेही पाहा- १७ किसही वाचवू शकले नाही हिमांशू मलिकचं करिअर

दरम्यान मॉडेल रोजासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सैफच्या आयुष्यात करीना कपूरची (Kareena Kapoor) एन्ट्री झाली. दोघेही ‘टशन’ चित्रपटावेळी एकमेकांच्या जवळ आले होते. त्यानंतर दोघांनी २०१२ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना तैमूर आणि जहांगीर अशी दोन मुले आहेत.

हेही वाचा-

Latest Post