मामा- भाचीचे प्रेम! आयतसोबत सलमानने माकडांना खाऊ घातले चिप्स अन् केळी, मजेदार व्हिडिओ पाहाच


बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चित्रपट आणि टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस १५’च्या शूटिंगमध्ये सतत व्यस्त आहे. व्यस्त शेड्युलमध्ये सलमान नेहमीच त्याच्या कुटुंबासाठी वेळ काढतो. नुकताच सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान त्याची बहीण अर्पिता खान शर्मा आणि आयुष शर्माची मुलगी आयत शर्माला आपल्या कडेवर घेताना दिसत आहे. सलमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर क्यूटनेसने भरलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो माकडांना खायला घालताना दिसत आहे.

सलमान आणि आयतचा व्हिडिओ
सलमानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सलमान माकडांना हाताने चिप्स खाऊ घालत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर, तो व्हिडिओमध्ये त्याची लाडकी भाची आयत त्याच्या कडेवर घेतलेली दिसत आहे आणि नंतर आयत माकडांना चिप्स खाऊ घालत आहे. यादरम्यान आयत खूप आनंदी होते आणि ती आनंदात टाळ्या वाजवते. इतकेच नाही, तर सलमान आयतच्या हातात एक केळी देतो, जे आयत माकडांना देते.

व्हिडिओवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
हा व्हिडिओ शेअर करत सलमानने एक मजेशीर कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “माकड.” सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. हा व्हिडिओ अवघ्या काही वेळात लाखो वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही, तर चाहतेही या व्हिडिओवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या या व्हिडिओला १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

एकाच दिवशी सलमान आणि आयतचा असतो वाढदिवस
आयत ही सलमान खानची लाडकी बहीण अर्पिताची मुलगी आहे. आयतचा जन्म २७ डिसेंबर, २०१९ रोजी झाला होता. याच दिवशी सलमानचाही जन्म झाला होता. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबासाठी ही तारीख खूप महत्त्वाची ठरली आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याचा मेहुणा म्हणजेच अर्पिताचा नवरा आयुष शर्माही आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री महिमा मकवाना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एवढं महाग! राजकुमारने लग्नात पत्रलेखाला घातले तब्बल ‘इतक्या’ लाखांचे मंगळसूत्र, सर्वत्र रंगलीय चर्चा

-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत

-श्वास रोखून धरा! करणच्या पहिल्या ऍक्शन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार सिद्धार्थ, पाहा फर्स्ट लूक


Latest Post

error: Content is protected !!