‘माझे नाव वापरून पैसा जमवण्याचा प्रयत्न…’, परवानगीशिवाय पोस्टरवर फोटो वापरल्यामुळे सुनील शेट्टीची पोलिसांत धाव

Actor Suniel Shetty Files Complaints Against A Production Company Over Illegal Use of His Photo In Film Poster


बॉलिवूडमधून चांगल्या- वाईट बातम्या येत आहेत. कुणाचं लग्न होतंय, तर कुणाच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडत आहेत. अशातच आता ‘अण्णा’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुनील शेट्टीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्याने बुधवारी (३ मार्च) एका चित्रपटाच्या पोस्टरनंतर एका प्रॉडक्शन कंपनीवर पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

खरं तर सुनील शेट्टीने तक्रार नोंदवलेल्या प्रॉडक्शन कंपनीचे नाव एम/एस बालाजी मीडिया फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड असे आहे. या कंपनीने आपल्या आगामी ‘विनीता’ या चित्रपटाचे बुधवारी पोस्टर रिलीझ केले होते. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुनीलही दिसत आहे. यानंतर त्याने असा दावा केला आहे की, या चित्रपटाच्या पोस्टरवर त्याच्या परवानगीशिवाय त्याचा फोटो लावला आहे.

सुनीलने आपल्या या तक्रारीत पुढे असाही दावा केला की, त्याच्या फोटोचा वापर करून व्यक्तींकडून पैसे मागितले जात आहेत. त्याने वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, ‘ही तक्रार एम/एस बालाजी मीडिया फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​प्रतिनिधित्व करणाऱ्या अमनप्रीत कौर आणि अरिजीत चॅटर्जी यांनी केलेल्या फसवुकीबाबत आहे.

मिड-डे मधील वृत्तानुसार, सुनील शेट्टीने आपल्या या तक्रारीबद्दल म्हटले की, “मला माहिती नाही की, हा चित्रपट कोणाचा आहे, कोण याची निर्मिती करत आहे. तसेच हा चित्रपट मी साईन केलेला नाहीये. ते उघडपणे एका कलाकाराचे शोषण करत आहेत. ते माझ्या नावाचा वापर करून पैसा जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे माझ्या नावाची बदनामी होते. त्यामुळे मी ही तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला.”

या तक्रारीनंतर एम/एस बालाजी मीडिया फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजर रणवीर सिंग यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, “आमच्याकडून चूक झाली आहे. आम्ही दोन चित्रपटांच्या कास्टिंगवर काम करत होतो. आम्ही सुनील शेट्टी आणि बॉबी देओल यांचा लूक चेक करण्यासाठी पोस्टर बनवले होते, परंतु कोणीतरी हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केले. आता हे पोस्टर सोशल मीडियावर हटवण्यात आले आहेत.”

तरीही, मॅनेजर रणवीर सिंग यांनी या गोष्टीला नकार दिला आहे की, या पोस्टरमार्फत कोणत्याही प्रकारचा पैसा जमा करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुनिल शेट्टीचा २५ वर्षीय मुलगा अहानच्या मित्रांची नावं वाचून तुम्हालाही बसेल धक्का, डिनो मोरियापासून ते…

-मोठ्या अपघातातून बचावलेला सुयश टिळक म्हणतोय, तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे वाचलो

-गुड न्यूज! कोट्यवधी चाहत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध करणारी ‘श्रेया घोषाल’ बनणार ‘आई’; बेबी बंपचा फोटो केला शेअर


Leave A Reply

Your email address will not be published.