मॅनेजरला थांबवून भररस्त्यावरच टायगर श्रॉफ करू लागला डान्स, लंडनमधला व्हिडिओ व्हायरल


बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस आणि उत्तम बॉडीसाठी ओळखला जातो. टायगर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याच्या फिटनेस व्हिडिओंसाठी चाहते त्याचे नेहमी कौतुक करत असतात. चाहते त्याच्या पर्सनॅलिटी तसेच त्याच्या अप्रतिम स्टंटचे कौतुक करताना थकत नाहीत. तो देखील वर्कआउटचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करायला विसरत नाही. त्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. नुकताच टायगर श्रॉफने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो तूफान व्हायरल होत आहे.

लंडनच्या रस्त्यावर केला डान्स
टायगरने नुकताच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याची शानदार बॉडी दाखवताना दिसत आहे. टायगर सध्या लंडनमध्ये असताना शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो त्याच्या मॅनेजरला थांबवतो आणि लंडनच्या रस्त्यावर डान्स करू लागतो. टायगरची ही स्टाईल त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. त्याच्या या व्हिडिओला २१ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यासह चाहते त्याच्या या व्हिडिओवर लाल हार्ट आणि फायर इमोजी वापरून प्रतिक्रिया देत आहेत.

मोठ्या प्रोजेक्टचा भाग आहे टायगर
टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘गणपत’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन दिसणार आहे. हा चित्रपट वाशू भगनन, पूजा एन्टरटेन्मेंट आणि गुड कंपनी निर्मित करत आहेत. दोन्ही कलाकार एकत्र स्क्रिन शेअर करण्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही दोघे ‘हिरोपंती’मध्ये दिसले आहेत. त्याचवेळी त्याचा दुसरा चित्रपट ‘हिरोपंती २’ ची घोषणाही झाली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तारा सुतारिया दिसणार आहे.

टायगर श्रॉफ शेवटचा ‘बागी ३’ मध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. यात रितेश देशमुख, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा

-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल


Latest Post

error: Content is protected !!