विकीची पत्नी बनण्यापूर्वी कॅटरिनाने घेतला ‘या’ ६ कलाकारांचा बदला, कसा ते घ्या जाणून


बॉलिवूडच्या प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली कॅटरिना कैफने (Katrina Kaif ) गुरुवारी (९ डिसेंबर) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याच्यासोबत सात फेरे घेतले. दोघांनी राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे लग्न केले. या लग्नाला १२० पाहुणे उपस्थित राहिले असले, तरी अनेक कलाकार या लग्नात सहभागी झाले नाहीत. माध्यमांतील वृत्तांनुसार, कॅटरिनाने काही कलाकारांना लग्नाला येण्याचे निमंत्रणही दिलेले नाही. चला तर मग जाणून घेऊया हे कलाकार कोण आहेत.

दीपिका पदुकोण
या यादीत दीपिका पदुकोणचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे, जिला कॅटरिनाने तिच्या लग्नासाठी आमंत्रित केले नाही. रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या दीपिकाची कॅटरिनामुळे अभिनेत्याने फसवणूक केली होती, तेव्हापासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे माध्यमांमध्ये सांगण्यात आले आहे.

प्रियांका चोप्रा
कॅटरिनाने प्रियांका चोप्रालाही लग्नाचे आमंत्रण पाठवले नाही. रणबीर कपूरमुळे कॅटरिना आणि प्रियांका यांच्यात सुरू झालेले शीतयुद्ध आजही सुरूच असल्याचे माध्यमांमध्ये सांगितले जाते.

रणबीर कपूर
रणबीर आणि कॅटरिनाचे एकेकाळी एकमेकांशी चांगले नातेसंबंध होते. मात्र, रणबीरने नंतर कॅटरिनासोबत ब्रेकअप केल्यानंतर आलिया भट्टला डेट करायला सुरुवात केली. यामुळेच कॅटरिनाला आपल्या लग्नातील जुन्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटला नाही.

सलमान खान
कॅटरिनाच्या लिंकअप्सच्या यादीत सलमान खानचाही समावेश झाला आहे. सलमान खानलाही लग्नाचे निमंत्रण मिळालेले नाही.

शाहरुख खान
माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘जब तक है जान’ चित्रपटात शाहरुख खानने कॅटरिनासोबत जबरदस्तीने किसिंग सीन टाकला होता. जेव्हा कॅटरिनाला हे समजले, तेव्हा ती खूप संतापली. कदाचित शाहरुखला लग्नाचे आमंत्रण न देण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.

जॉन अब्राहम
एकेकाळी जॉन अब्राहमने कॅटरिना कैफला चित्रपटातून काढून टाकल्याच्या बातम्या आल्या होत्या, तेव्हापासून कॅटरिना आणि जॉनमध्ये शीतयुद्ध सुरूच आहे.

याच कारणामुळे कॅटरिनाने जॉनला लग्नाचे आमंत्रणही पाठवले नसल्याचे बोलले जाते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!