अवघडंय! ‘या’ सिनेमांच्या स्टोरी ढापून बॉलिवूडने बनवलेत हिंदी चित्रपट, शेवटच्या मूव्हीचे नाव वाचून बसेल शॉक

0
98
Ghajini-And-Baazigar
Photo Courtesy : ScreenGrab/YouTube/Kevin Paul

चाहते बॉलिवूडवर नेहमीच टीका करतात की, यांना काही नवीन बनवताच येत नाही. हे साऊथच्या आणि हॉलिवूडच्या सिनेमांच्या स्टोरी ढापतात. असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांच्याबद्दल वाचून तुम्ही नक्कीच शॉक व्हाल की, अरे हे सुद्धा ढापलेलेच सिनेमे आहेत, तर मग बॉलिवूड ओरिजनल काही बनवते की नाही आणि ते स्वतः काय कष्ट घेतात? चला तर जाणून घेऊया त्याच सिनेमांबाबत…

सत्ते पे सत्ता
‘सत्ते पे सत्ता’ हा सिनेमा एकेकाळी खूप गाजला होता. या सिनेमाची स्टोरी आपल्या सर्वांना माहीतच असेल. १९८२ मध्ये हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमात ७ भावांची कहाणी सांगितली होती. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग होता. अमिताभ हे मोठ्या भावाची भूमिका साकारत होते आणि या सिनेमात ते हेमा मालिनीच्या प्रेमात देखील होते, पण तुम्हाला माहित आहे का? हा सिनेमा १९५४ साली आलेल्या ७ ब्राईड्स फॉर ७ ब्रदर्स या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक होता.

चाची ४२०
दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला ‘चाची ४२०’ सर्वांच्याच लक्षात असेल. १९९७ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा सिनेमा त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. फातिमा सना शेखने या सिनेमात कमल हासन आणि तब्बू यांच्या मुलीची भारती रतनने व्यक्तीरेखा साकारली होती. या सिनेमाचं चित्रीकरण खुद्द कमल हासन (Kamal Haasan) यांनी केले होते. यामध्ये तब्बू ही अमरीश पुरी यांची मुलगी दाखवण्यात आली आहे. यामध्ये कमल हासन यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा ‘मिसेस डाउटफायर’ या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे. हा सिनेमा १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाची स्टोरी ‘चाची ४२०’ मध्ये दाखवण्यात अली आहे.

बाजीगर
आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर भुरळ घालणारा अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. त्यातील सुपरहिट सिनेमांमुळे तो किंग खान, बादशाह, राज यांसारख्या नावांनी ओळखला जातो. त्याचा ‘बाजीगर’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण बाजीगर या सिनेमात त्याने वठविलेल्या खलनायकाच्या भूमिकेमुळे त्याच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली. “कभी- कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है..और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं.” त्याचा हा डायलॉग प्रेक्षकांच्या डोक्यात एकदम फिट बसलाय. ‘बाजीगर’ सिनेमा ‘अ किस बिफोर डाईंग’ या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे.

गजनी
‘गजनी’ म्हटल्यावर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आमिर खान (Aamir Khan) आणि त्याचा या सिनेमातील उत्तम अभिनय, आणि त्याची केसांची स्टाईल. तरुणवर्ग तर त्याच्या या स्टाईलवर फिदाच होता. इतकंच नाही, तर काही मुलांनी देखील गजनी स्टाईल केली होती. विशेष म्हणजे, अशी हेअरस्टाईल करणारा एखादा ओळखीचा मित्र दिसला, तर त्याला बघून ‘ए गजनी, ए गजनी’ असंही म्हणायचे. मित्रांनो २००८ साली रिलीज झालेला ‘गजनी’ हा सिनेमा ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन ‘अ र मुरुगादोस’ यांनी केलं होतं. विशेष म्हणजे, हा सिनेमा मुरुगादोस यांच्या २००५ सालच्या ‘गजिनी’ या तमिळ सिनेमाचा रिमेक आहे, जो २००० च्या ‘मेमेंटो’ आणि १९५१ च्या ‘हॅप्पी गो लव्हली’ या ब्रिटिश सिनेमापासून प्रेरित आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

भारतीय सैन्याचा नादच खुळा! बॉम्बवर रवीनाचे नाव लिहीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेट देण्याचा केलेला प्लॅन

पाकिस्तानी क्रिकेटर्सनी लय घासली, पण बॉलिवूड अभिनेत्रींचं प्रेम मिळालंच नाही, एक तर किडनॅप करायला निघालेला

कशी नशिबाने थट्टा मांडली! आलिशान आयुष्य सोडून कलाकार भिकाऱ्याच्या रूपात झाले पब्लिक प्लेसमध्ये स्पॉट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here