गुंडा या भोजपुरी चित्रपटाची २०१९ मध्ये चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटाचे निर्माते सिकंदर खानवर (Sikandar Khan) चित्रपटातील अभिनेता असलेल्या विनोद यादवने ( Vinod Khan) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची त्या काळात चांगलीच चर्चा रंगली होती. या प्रकरणाचा खटला गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता. यावर आता कोर्टाने मोठा निकाल दिला असून अभिनेता विनोद यादवच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला असून निर्मात्यांवरील सर्व आरोप सत्य असल्याचा आणि यासंबंधित संपुर्ण चौकशी करण्याचा महत्वाचा निर्णय दिला आहे.
याबाबत संपुर्ण माहिती अशी की, गुंडा चित्रपटाचा निर्माता सिकंदर खानने या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आर्थिक परिस्थितीचे कारण देत अभिनेत्याकडूनच ५० लाख रुपये उधार घेतले होते. मात्र चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर त्याने हे पैसे देण्यास नकार दिला. इतकेच नव्हेतर या प्रकरणात त्यांनी पैसे मागितल्यावरुन अभिनेत्याच्या घरात घुसून मारहाण केली होती. याविरोधात अभिनेता विनोद यादवने न्यायालयात धाव घेत चित्रपटाच्या निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची त्या काळात चांगलीच चर्चा झाली होती. या प्रकरणात निर्मात्याने चित्रपटाच्या अभिनेत्याला चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवले होते. आणि चित्रपट जितकी कमाई करेल त्यामधील पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. या चित्रपटाचे संपुर्ण बजेट ८३ लाख इतके होते.
दरम्यान चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणि चांगली कमाई केल्यानंतर निर्मात्याने दिलेला शब्द पाळला नाही. यावेळी त्याला विनोद यादवने पैशाची मागणी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले आणि पैसे देण्यास नकार दिला. इतकेच नव्हेतर या प्रकरणात अभिनेत्याला मारहाण केल्याचाही आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता.यानंतर विनोद कुमार यादवने न्यायालयात धाव घेतली होती. आता दोन वर्षांनी या प्रकरणावर न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला असून हे सगळे आरोप खरे असल्याचे मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा –
- धर्मेंद्र यांनी घातलेला ‘तो’ राडा, ज्यामुळे मोडले होते जितेंद्र आणि हेमा मालिनीचे लग्न, वाचा खास लव्हस्टोरी
- Jackie Chan Birthday: जॅकी चॅनचे बॉलिवूडशी खास नाते, ‘या’ चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांसोबत केले आहे काम
- HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका