‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा हिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अदा हिला फूड पॉयझनिंग आणि डायरियाचा त्रास होऊ लागल्याने तिची तब्येत खूपच बिघडली होती. त्यामुळे उपचारांसाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या विषयी एक नवीन अपडेट आली आहे. अदाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिला कोणत्या प्रकारची ॲलर्जी आली आहे हे तिने दाखवले आहे.
आगामी सीरिजच्या प्रमोशनसाठी जात असतानाच अदा शर्माची (Adah Sharma) तब्येत अचानक खालावली. तिला डायरियाचाही बराच त्रास होत असून सध्या डॉक्टरांनी तिला निगराणीखाली ठेवले आहे. अदाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे त्या फोटोंमध्ये तिच्या अंगावर लाल पुरळ उठल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने स्वतःचे हात आणि पाय यांचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करताना अदाने एक लांबलचक कॅप्शनही लिहिले आहे. अदाने कॅप्शनमध्ये आधी मेसेज करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आणि लोकांचे आभार मानले आहेत.
अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की “उजवीकडे स्वाइप करू नका, तुम्हाला त्वचेवर पुरळ येण्याची भीती वाटू शकते, छायाचित्रे थोडी भीतीदायक आहेत पण मला वाटले की फक्त सुंदर चित्रेच इंस्टाग्रामवर शेअर करू नयेत. अदा शर्माच्या कॅप्शननुसार, ती काही दिवसांपासून आजारी होती. तिला पित्ताचा त्रास झाला आहे, पण आता ती तिच्या चेहऱ्यावरही आली आहे. अदाने सांगितले की जेव्हा तिने ते औषध घेतले तेव्हा तिला औषधाची ऍलर्जी झाली आणि खूप उलट्या झाल्या. आता औषध बदलले आहे. हे फोटो समोर आल्यानंतर अदाचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. प्रत्येकजण कमेंट्सद्वारे त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.
अदा शर्मा ‘कमांडो’या आगामी सीरिजमध्ये दिसणार आहे.विपुल अमृतलाल शाह आणि सनशाइन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड च्या दिग्दर्शनखाली बनलेली ही वेबसिरीज लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.(actress adah sharma hospitalized after diarrhea and allergy gave health update)
अधिक वाचा-
–‘सैराट’फेम रिंकू राजगुरुने शेअर केला पहिल्यांदा नाटक पाहण्याचा अनुभव; म्हणाली, ‘असं नाटक…’
–गोविंदाच्या अकाऊंटवरील हिंदूसंदर्भातील ‘त्या’ पोस्टवरुन वाद; अभिनेता म्हणाला, ’18 वर्षांपूर्वी राजकारण सोडले, परत…’