उत्तम अभिनय, जबरदस्त डान्स आणि अप्रतिम सौंदर्य म्हणजे अमृता खानविलकर, पाहा तीचे ग्लॅमरस फोटो


मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनय, डान्स आणि सौंदर्य असा तिहेरी मिलाप असणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. नुकतेच तिने तिचे बोल्ड आणि ब्युटिफुल फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहे.

‘वाजले की बारा’ म्हणत अमृताने तिच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले.

अमृताने तिच्या जबरदस्त डान्समुळे ‘नच बलिये’ या हिंदी डान्स स्पर्धेचे विजेतेपद देखील मिळवले.

मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील तिने तिच्या डान्स आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले.

अमृता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते, तिचे फोटो, व्हिडिओ, अपडेट ती फॅन्ससोबत शेयर देखील करत असते.

अमृताने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. पाहताचक्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडावे अशा अदा तिच्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

अमृता लवकरच सचिन कुंडलकर यांच्या पॉण्डेचेरी सिनेमात दिसणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.