क्रिकेट आणि बॉलिवूडचं तसं फार जुनं नातं आहे. अनेक क्रिकेटपटू बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडलेत. त्यापैकी अनेकांनी अभिनेत्रींशी संसारही थाटला आहे. याच यादीत अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावाचाही समावेश होतो. अनुष्का बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तर विराट कोहलीने भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्वपदही भूषवलं आहे. हे जोडपे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विराट सध्या मोहालीमध्ये आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी पंजाबमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, अनुष्काला घरी विराटची खूप आठवण येतेय. याबद्दल तिने भावूक पोस्ट शेअर केली आहे.
खरं तर, अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने पती विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यासोबतच अनुष्काने कॅप्शनमध्ये भावूक नोटही लिहिली आहे. तिने लिहिले की, “जग आणखी रोमांचक, मजेशीर आणि सुंदर वाटते, जेव्हा तुम्ही या ठिकाणी असाल किंवा या व्यक्तीसोबत हॉटेलच्या बायो-बबलमध्ये.” अनुष्काने या कॅप्शनमध्ये #MissingHubby या हॅशटॅगसोबत लव्ह इमोजीही शेअर केला आहे.
View this post on Instagram
दुसरीकडे, अनुष्काच्या या पोस्टवर विराटनेही शानदार प्रतिक्रिया दिली आहे. विराटने अनुष्काच्या या पोस्टवर कमेंट करत दोन हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तसेच, त्यांच्या मध्ये इन्फिनिटीचे चिन्हदेखील वापरले आहे. अनुष्काच्या या पोस्टवरील विराटची कमेंट सर्वांचे लक्ष वेधत आहे.
अनुष्का- विराटचे लग्न
अभिनेत्री अनुष्का आणि क्रिकेटपटू विराटचे लग्न 11 डिसेंबर, 2017मध्ये झाले आहे. त्यांच्या लग्नाला 4 वर्षे लोटल्यानंतर त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले. त्यांच्या मुलीचे नाव ‘वामिका’ असे आहे. हे जोडपे मुलगी वामिकाला लाईमलाईटपासून नेहमीच दूर ठेवतात.
अनुष्काचे सिनेमे
अनुष्का शर्माच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या तिच्या आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अनुष्का एका खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच, विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेमध्ये व्यस्त आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आता वेळ आलीये…’, चंदिगड विद्यापीठातील व्हायरल एमएमएसवर सोनू सूदचा संताप
बॉलिवूडवर बहिष्काराच्या ट्रेंडमध्ये ‘हे’ हिंदी कलाकार साउथच्या सिनेमात करणार पदार्पण
‘कामामध्ये आव्हान हेच आयुष्याचे खरे यश,’ दुलकर सलमानने शेअर केला अनुभव