Friday, April 19, 2024

‘कामामध्ये आव्हान हेच आयुष्याचे खरे यश,’ दुलकर सलमानने शेअर केला अनुभव

तेलुगू इंडस्ट्रीचा लोकप्रिय अभिनेता दुलकर सलमान याने आपल्या दमदार अभिनयाने तेलुगू इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने खूप कमी वेळात यशाचे शिखर गाठले आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘सीता रामम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. या चित्रपटानंतर तो चांगलच चर्चेत आला असून तो बॉलिवूडमध्ये ‘चुप’ या चित्रपटामधून पदार्पण करत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत सनी देओल सारखे दिग्गज कलाकर काम करताना दिसणार आहे.

दुलकर सलमान (Dulquer salmaan) हा अभिनेता तेलुगू इंडस्ट्रीतील बहुचर्चित अभिनेता ममूटी(Mumuti) यांचा मुलगा आहे. देशी व्यापारामध्ये सक्रिय होता. त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “माझे लहानपण हे व्यवसायिक कुुटुंब असणाऱ्या मित्रामध्ये गेले होते आणि त्याच मित्रासोबत शाळा, कॉलेज झाले होते. त्यामुळे व्यवसायाच्या गोष्टी मला आवडू लागल्या आणि मी व्यवसायामध्ये करिअर केले. तेव्हा काही लोक मला म्हणायचे की, तु हिरो का नाही बनत? तेव्हा मला वाटायचे की, मल्याळम इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही स्टरकिडच्या मुलाचे करिअर बनत नाही. त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी टोचत होती. त्यामुळे मी ठरवले होते की, मी अभिनय नाही करणार.”

9 ते 5 च्या नोकरीमध्ये लागले नाही मन
अभिनय हा सलमानच्या रक्तामध्येच भरलेला होता. त्याला फक्त एकच भिती होती की, तो जर अपयशी झाला तर लोक त्याला नावं ठेवतील. त्यामुळे त्याने शिक्षण पुर्ण केल्यानंतर एका ऑफिसमध्ये काम केले, मात्र 9 ते 5 च्या वेळामध्ये त्याला काम करणे अवघड चालले होते. सलमान सांगतो की, कागद, कंप्युटर जेही मी काम करत असेल, त्या कामामध्ये मी खूष तर होतो पण माला हवे तसे सुख मिळत नव्हते. माझ्या मित्रांपैकी कोणच अभिनय क्षेत्रात असलेल्या कुटुंबात नव्हते. मग मी वेळ काढण्यासाठी लघुचित्रपट बनवण्याची सुरुवात केली होती तेव्हा मला समजले की माझे सुख कशामध्ये आहे. मनाची शांतता आणि खरे सुख काय असते?”

आव्हानाला ओलांडून पुढे जाने हेच खरे जिंगने आहे.
सलमान दुलकरच्या मते आपल्या मनाला मारुन कोणत्याच क्षेत्रामध्ये यशस्वी होणे खूपच कठिण आहे. प्रत्येक युवकाने लोकांच्या भितीमुळे आपला व्यवसाय नाही निवडला पाहिजे. या गोष्टावर भर देत सलमान पुढे बोलतो की, एका यशस्वी बापाची मुले असतात त्याच्यावर खूच दबाव असतो. ते कोणाला सांगत नाही पण ही गोष्ट खरी आहे. दुसऱ्यांना वाटत असेल की, यांना तर सगळं आयतं वाढलेलं आहे, त्यांना मेहनत करण्याची गरजच नाही. मात्र मेहनत करणे आणि स्वत:ला सिद्ध करणे हे दोन्ही वेगळे आहे. मलाही सुरुवातीला खूप भिती वाटत होती की, माझी तुलना माझ्या वडिलांसोबत करतील की काय. त्यामुळे मी निर्देशनातही काम करण्याचा विचार केला होता. पण पुन्हा एकदा मला समजले की, जे काम आपल्यासमोर आव्हान बनून येते त्या कामाला जिंकून दाखवने हे खरे ध्येय असते.

कौशल्यासाठी घबरलने गरजेचे आहे.

जास्त तर प्रत्येक यशस्वी माणसामध्ये एका गोष्टीचे साम्य असते की, तो काहीकरी नवीन सुरु करत असताना त्याच्या मनामध्ये दड भिती भरलेली असते. आणि तीच भिती त्यांच्या यशस्वी होण्यामागचे कारण असते. याच भितीने दुलकर सलमानलाही प्रेरणा मिळाली आहे, आणि याच्याबद्दल बोलत असताना तो सांगतो की, “कोणतेही काम आपण एकटे करत असतो तेव्हा आपल्याला एवढी भिती वाटत नाही पण चित्रपटाची शूटींग करणे म्हणजे अनेक लोकांचा सामना करणे. त्यामुळे माल वाटायचे की, शूटिंग करत असताना जास्त रिटेक आले तर माझ्यावर सगळेजन हसतील माझा मजाक बनवतील. याभितीने माझी स्मरणशक्ती वाढली आणि मला पाठांतराचा सराव चांगला झाला. माला एवढी जास्त सवय झाली की मी 10 ओळीे चे डायलॉगही लगेच पाठ करु शकतो.

पैसे नाही मिळाले तरी चालेल

दुलकर सलमान एक अभिनेता म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यांना प्रभावित करणारी एक गोष्ट सगळ्यांनाच खूप आवडते. तो एक अभिनेता शिवाय एक माणूस म्हणूनही खूप चांगल्या मनाचा आहे. चित्रपट खूपच जास्त प्रिसिद्ध झाल्यावर तो पैशाचा मोह नाही दाखवत. सलमानच्या मते, “अभिनय हे मी पैसे कमवण्याचे साधन कधीच मानले नाही. माझे स्वत:चे अनेक व्यवसाय आहेत ज्यामुले माला चांगला नफा मिळतो. कोणत्याही भाषेत चांगला चित्रपट बघण्यासाठी मिळत आहे, चिएत्रपटाने भाषेची सीमा ओलांडली आहे. त्यामुळे मला प्रत्येकच भाषेच्या चित्रपटामध्ये काम करायचे आहे. चित्रपटामध्ये भुमिका चांगली असेल तर पैसे मिळाले किंवा नाही मिळाले मला फरक पडत नाही. माला फक्त चांगला चित्रपट करायचा आहे.”
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेहा वाचा
‘तुला दोन आई आहेत…’, म्हणत अली असगरच्या मुलांची उडवली होती खिल्ली, किस्सा ऐकून तुम्हीही व्हाल भावूक
प्रिया आनंदने ‘फुकरे’ चित्रपटातून मिळवली ओळख, ‘या’ व्यक्तीशी करायचे होते लग्न
बिग ब्रेकिंग I अभिनेता रणवीर शौरीच्या वडिलांचे दुखःद निधन, शेअर केली भावूक पोस्ट

 

 

 

हे देखील वाचा