×

दीपिका पदुकोणने मोनोकिनीमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, किलर अंदाज पाहून तुमच्याही तोंडून निघेल वाह!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी स्वतःला सतत कामात व्यस्त ठेवते. त्यासह ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती तिच्या जबरदस्त स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत असते. दीपिकाने तिच्या ग्लॅमरस लूकने पुन्हा एकदा इंटरनेटवर तापमान वाढवले ​​आहे. ग्लॅमर गर्लने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे हे फोटो पाहून तुमचेही होश उडतील.

Photo Courtesy: Instagram/deepikapadukone

दीपिकाने ग्लॅमरस फोटो शेअर करून वाढवले तापमान 

दीपिकाची (Deepika Padukone) टोन्ड बॉडी, किलर लूक, ग्लॅमरस लूक तुम्हालाही वेड लावेल. हे फोटो पाहून तुमच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडेल वाह. दीपिकाच्या मॅगझिन फोटोशूटचे ४ फोटो समोर आले आहेत. अभिनेत्रीचा बिनधास्त अंदाज या चारही फोटोंमध्ये पाहायला मिळतो. पिवळ्या मोनोकनीमध्ये दीपिकाचे सौंदर्य पाहून तुम्हालाही हेवा वाटेल. तुम्हालाही असे वाटेल की, तुमचीही अशी फिट आणि टोन्ड बॉडी असावी.

Photo Courtesy: Instagram/deepikapadukone

दुसऱ्या फोटोत दीपिका पांढऱ्या मोनोकिनीमध्ये किलर पोझ देत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये दीपिका काळ्या रंगाच्या मोनोकिनीच्या फर श्रगमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. शेवटी समोर आलेला फोटो तुम्हाला अभिनेत्रीचे कौतुक करायला भाग पाडेल. दीपिकाचा किलर हिरवाईच्या वातावरणात काळ्या रंगाच्या मोनोकोनीत खुर्चीवर बसलेल्या फोटोबद्दल काय बोलावे. दीपिकाचे हे स्टनिंग पोझ व्हायरल होत आहेत.

Photo Courtesy: Instagram/deepikapadukone

दीपिका पदुकोणची ‘गहराइया’ चित्रपटातील ग्लॅमरस इमेज पाहिल्यानंतर तिचे हे फोटो चाहत्यांसाठी नक्कीच एक ट्रिट ठरेल. ‘गहराइया’च्या यशानंतर दीपिका पदुकोणचा आनंद गगनात मावेना. तिच्या दमदार अभिनयाचे प्रेक्षक चाहते झाले आहेत. हे नवीन वर्ष दीपिकासाठी आनंद आणि यश घेऊन आले आहे असेच म्हणावे लागेल.

Photo Courtesy: Instagram/deepikapadukone

दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी दिग्दर्शित केलेला ‘गहराइया’ हा चित्रपट रिलेशनशिप ड्रामा आहे. ज्यात आजच्या नात्यातील गुंतागुंत आणि तरुणाईच्या आयुष्यातील खास पैलू आणि स्वत:च्या हिमतीवर जीवन मुक्तपणे जगण्याची इच्छा यांचे चित्रण केेले आहे.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

Latest Post