Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड दीपिका पदुकोणला वयाच्या १८व्या वर्षी ब्रेस्ट इम्प्लांटचा दिला होता सल्ला, अभिनेत्रीने म्हणाली ‘सर्वात वाईट…’

दीपिका पदुकोणला वयाच्या १८व्या वर्षी ब्रेस्ट इम्प्लांटचा दिला होता सल्ला, अभिनेत्रीने म्हणाली ‘सर्वात वाईट…’

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी स्वतःला सतत कामात व्यस्त ठेवते. त्यासह ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती तिच्या जबरदस्त स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत असते. दीपिका ही त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी वेगवेगळ्या पात्रांद्वारे लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 2005 मध्ये ती पहिल्यांदा हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’ म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. या म्युझिक व्हिडिओनंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि 2007 मध्ये शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ चित्रपटात दिसली.

दीपिकाचा (Deepika Padukone) ‘गहराइया’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. नात्यांच्या जडणघडणीत विणलेला हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आणि त्यात त्याच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे दिसले. दीपिका पदुकोणच्या आगामी चित्रपटांमध्ये शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) ‘पठाण’ आणि ऋतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) ‘फायटर’ यांचा समावेश आहे. पण यासोबतच तिची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखती’त दीपिका पदुकोणने तिला मिळालेल्या वाईट आणि चांगल्या सल्ल्याची माहिती दिली आहे.

अलीकडेच, फिल्मफेअरच्या ताज्या मुलाखतीत दीपिका पदुकोणला विचारण्यात आले की, “तुम्हाला आतापर्यंत मिळालेला सर्वोत्तम आणि सर्वात वाईट सल्ला कोणता आहे.” यावर दीपिका पदुकोण म्हणाली की, “शाहरुख खानने मला सर्वोत्तम सल्ला दिला आणि मी त्याच्याकडून खूप काही शिकले आहे. मला मिळालेला सर्वात मौल्यवान सल्ला त्याच्याकडून मिळाला. तो म्हणाला की, फक्त अशा लोकांसोबत काम करा ज्यांच्यासोबत तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल. असे वाटते कारण तुम्ही चित्रपट बनवत असतानाही तुम्ही आयुष्य जगत आहात. काही चांगल्या आठवणी जपत आहात आणि अनुभवाचा आनंद घेत आहात. मला मिळालेला सर्वात वाईट सल्ला ब्रेस्ट इम्प्लांटसाठी होता. मी 18 वर्षांची होते आणि मला अनेकदा प्रश्न पडतो की, ते गांभीर्याने न घेण्याची माझ्यात बुद्धी कशी होती.”

दीपिका पदुकोणच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर जवळपास सहा वर्षे डेटिंग केल्यानंतर दीपिकाने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगशी 2018 साली लग्न केले. या जोडीने ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ आणि ‘पद्मावत’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ’83’ हा लग्नानंतरचा पहिला एकत्र चित्रपट आहे.

दीपिका पदुकोण करिअर

दीपिकाच्या इंडस्ट्रीतील अभिनय प्रवासाविषयी बोलायचे झाले, तर अभिनेत्रीने 2007 मध्ये फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर दीपिका एकामागून एक यशाच्या पायऱ्या चढत गेली. ‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ सारखे उत्तम चित्रपट तिने केले आहेत.(actress deepika padukone got breast implant advice at the age of 18 the actress said worst advice 2)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
दीपिका पदुकोणचा मॉर्निंग लूक! शेअर केल्या स्किन केअरसाठी 5 महत्वाच्या टीप्स

एकदा नाही तर हजारवेळा दीपिका पदुकोणने बोललेत चुकीचे डायलॉग, मस्तीचा व्हिडिओ आला समोर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा