Friday, March 29, 2024

खराब टीआरपीचा बळी ठरतोय ‘बिग बॉस १५’, जुनी बाजी खेळत निर्मात्यांनी आखली ‘ही’ योजना

इतर शोप्रमाणे, टेलिव्हिजनचा सर्वात मोठा आणि वादग्रस्त रियॅलिटी शो ‘बिग बॉस’ देखील अनेकदा खराब टीआरपीचा बळी ठरला आहे. मात्र, प्रत्येक वेळी निर्मात्यांना काहीतरी मार्ग सापडतो, ज्याच्या आधारे तो पुन्हा लोकप्रिय होतो. गेल्या सीझनमध्ये जेव्हा शोचा टीआरपी कमी झाला, तेव्हा निर्मात्यांनी ड्रामा क्वीन राखी सावंतला शोमध्ये प्रवेश दिला. यानंतर टीआरपीमध्ये जबरदस्त वाढ झाली होती.

निर्मात्यांनी खेळली जुनी बाजी
या सीझनमध्येही शोचा टीआरपी फारसा चांगला राहिला नाही. महत्वाचे म्हणजे, ‘बिग बॉस’ टॉप- १०च्या यादीत देखील स्थान मिळवू शकलेला नाही. यामुळे निर्माते आता जुन्या पद्धतीने ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच बातमी येत आहे की, रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करू शकतात. (bigg boss 15 makers made huge change to gain trp old contestants to re enter in the show)

घरात होणार नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्री
माध्यमातील वृत्तानुसार, रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून घरात प्रवेश करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले पुढील आठवड्यात किंवा या आठवड्याच्या शेवटी घरात प्रवेश करणार आहेत. ते थेट कुटुंबातील सदस्यांशी स्पर्धा करतील. तिच्या सीझनमध्ये रश्मी देसाई या शोसाठी चांगली टीआरपी मिळवणारी ठरली होती.

सिद्धार्थ शुक्लासोबत रश्मी देसाईचे भांडण, शोमधील आतापर्यंतच्या काही सर्वात मोठ्या भांडणांमध्ये गणले जाते. भांडणादरम्यान रश्मीने सिद्धार्थवर गरम कॉफी फेकली होती. इतकेच नाही, तर रश्मी देसाईच्या वैयक्तिक आयुष्याबाबत घरात इतके खुलासे झाले की, प्रेक्षकांचे लक्ष पूर्णपणे रश्मीकडे गेले. मात्र, या सर्व गोष्टी असूनही ती शो जिंकू शकली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कार्तिक आर्यनने ‘दोस्ताना २’बद्दल सोडले मौन, चित्रपटातून बाहेर काढण्याबद्दल केले मोठे वक्तव्य

-लवकरच शोमध्ये परतणार शमिता; एकटी नव्हे, तर ‘बिग बॉस १३’चे ‘हे’ दोन स्पर्धकही करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

-चहुबाजूंनी विरोध होत असताना, कोमेडियन वीर दासच्या समर्थनार्थ आली काम्या पंजाबी; म्हणाली…

हे देखील वाचा