गिफ्ट असावं तर असं! अभिनेत्री काजल राघवानीच्या वाढदिवशी रिलीझ झाले नवीन गाणे; मिळाले ५ लाख हिट्स


भोजपुरी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजल राघवानी होय. काजलच्या चित्रपटांना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत असते. अभिनेत्री मंगळवारी (२० जुलै) आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा वाढदिवस वर्ल्डवाइड रेकॉर्ड्स भोजपुरीने आपल्या वेगळ्या अंदाजात साजरा केला आहे. तिचे चाहतेही तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. वर्ल्डवाइड रेकॉर्ड्स भोजपुरीने काजलच्या वाढदिवशी तिचे एक अप्रतिम गाणे प्रदर्शित केले आहे.

काजलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नवीन गाण्याचे नाव ‘जान गईनी ए हो जान’ असे आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. (Bhojpuri Actress Kajal Raghwani Birthday Priyanka Singh Song Jaan Gayini Ye Ho Jaan Release On Youtube)

या गाण्याचे निर्माते रत्नाकर कुमार आहेत. रत्नाकर यांनी काजलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटले आहे की, “नेहमी निरोगी राहा, मस्त राहा आणि कामात व्यस्त राहा. तिच्या वाढदिवशी आम्ही ‘जान गईनी ए हो जान’ गाणे प्रदर्शित केले आहे. ज्याला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हे गाणे आम्ही भव्य पद्धतीने चित्रीत केले आहे. हे गाणे अनेक रमणीय लोकेशनवर शूट केले आहे. गाण्यातील काजलची निरागसता आणि तिचा सिंपल लूक चाहत्यांना खूप आवडत आहे.”

हे गाणे वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होताच व्हायरल होत आहे. या गाण्याला आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे प्रियांका सिंगने गायले आहे.

नुकतेच वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स प्रस्तुत ‘नेनुआ और गरईआ मछरी’ सारख्या ब्लॉकबस्टर गाण्याचे दिग्दर्शन करणारे व्हिडिओ दिग्दर्शक रवी पंडित यांनी काजल राघवानीच्या या व्हिडिओचे दिग्दर्शन केले आहे. या गाण्याचे शब्द हृदयाला भिडणारे आहेत. या गाण्यात काजलच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स असो किंवा परफॉर्मन्स, तिने खूपच प्रभावित केले आहे.

या शानदार गाण्याची निर्मिती रत्नाकर कुमार यांनी केली असून संगीतकार रजनीश मिश्रा आहेत. तसेच गीतकार रजनीश मिश्रा आणि आशुतोष तिवारी आहेत. दिग्दर्शक रवी पंडित आहेत. कोरिओग्राफर ऋतिक आरा आणि एडिटर दीपक पंडित आहेत. तसेच प्रॉडक्शन हेड पंकज सोनी आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इतके पैसे कसे कमवता?’, कपिल शर्माने विचारलेल्या प्रश्नावर राज कुंद्राने दिली होती ‘अशी’ रिऍक्शन

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या


Leave A Reply

Your email address will not be published.