अभिनेत्री किश्वर मर्चंट अन् बाळाचे झाले जंगी स्वागत, फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल

टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि तिचा पती अभिनेता सुयश राय दोघेही २७ ऑगस्ट, २०२१ रोजी एका मुलाचे पालक झाले. याची माहिती किश्वरने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. मात्र, आता किश्वरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जेव्हा ती आपल्या बाळासह तिच्या घरी पोहोचली, तेव्हा तिचे त्यांच्या घरी जंगी स्वागत करण्यात आले. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. घरी पोहोचल्यानंतर किश्वरने इंस्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये ती बाळाला स्तनपान करताना दिसत आहे.

किश्वर बाळाला करतीय स्तनपान
किश्वरने सोशल मीडियावर बाळाला स्तनपान करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर कॅप्शन लिहिले की, ‘खा… झोप… खा…रिपीट.’ अनिता हंसदानी, विशाल सिंग, बंदगी कालरा, पारस बब्बर यांनीही किश्वरच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि तिचे अभिनंदन केले आहे. (Actress Kishwar Merchant and the baby had a grand welcome, shared photos and videos)

View this post on Instagram

A post shared by Kishwer M Rai (@kishwersmerchantt)

बाळाचे आणि किश्वरचे कुटुंबीयांनी केले स्वागत
किश्वर आणि सुयशचे लग्न २०१६ मध्ये झाले होते. लग्नाच्या ५ वर्षानंतर हे दोघं आई- वडील झाले आहेत. या जोडप्याचे हे पहिले बाळ आहे. आई आणि मुलाचे त्यांच्या घरी असे जंगी स्वागत करण्यात आले. या दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ किश्वरने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या व्हिडिओद्वारे, किश्वरने या जंगी स्वागतासाठी तिच्या कुटुंबाचे आभार मानले आहेत. तिने लिहिले की, “घरी आमचे स्वागत… सर्व खास लोकांनी हे खूप खास बनवले.”

View this post on Instagram

A post shared by Kishwer M Rai (@kishwersmerchantt)

बाळाची खोली अशी सजवली
व्हिडिओमध्ये सुयश आणि किश्वरचे छोट्या पूजेने स्वागत केले जात आहे. घर निळ्या, चांदी आणि पांढऱ्या रंगाच्या फुग्यांनी सजवलेले आहे. तिच्या खोलीत प्रवेश करताच तिला भिंतीवर बॅनर दिसल्याने आश्चर्य वाटले. बॅनरवर लिहिले आहे की, “तुझे स्वागत आहे होम बनी.” हा बॅनर आणि खोली तिच्या मुलासाठी तयार करण्यात आली आहे. बॅनरच्या खाली पाळणा आहे, जे अतिशय सुंदर सजवलेले आहे.

किश्वरने डिलीव्हरीच्या समस्या केल्या शेअर
यापूर्वी किश्वर मर्चंटने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये किश्वर मुलाला हॉस्पिटलच्या बेडवर घेऊन बसलेली दिसत आहे. हे फोटो शेअर करताना, किश्वरने तिच्या गर्भधारणेविषयी आणि प्रसूतीनंतरच्या समस्यांबद्दल लिहिले आहे. ‘माझ्या बग्स बनी! मला माहिती आहे की, बर्‍याच समस्या आहेत, मी सी-सेक्शन, वेदना कमी करणारे, थकवा, चिंता आणि स्तनपानासह मी सर्वोत्तम नाही… पण आज आम्ही एकमेकांना वचन दिल्याप्रमाणे, आम्ही दोघेही या प्रवासात एकमेकांना मदत करेल आणि आमच्यासाठी गोष्टी चांगल्या करू. माझं तुझ्यावर प्रेम आहे बाळा.”

View this post on Instagram

A post shared by Kishwer M Rai (@kishwersmerchantt)

किश्वरच्या पोस्टला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. या पोस्टला १ लाखापेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

-खुशखबर! ‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ची एन्ट्री; स्पर्धकांनी जंगल केले पार, तर उघडणार ‘बिग बॉस’चे द्वार

Latest Post