Tuesday, May 21, 2024

बाबो! वन नाईट स्टॅंडनंतर झाली होती प्रेग्नेंट, अभिनेत्री कुब्रा सैतचा धक्कादायक खुलासा; म्हणाली ‘मी रात्रभर…’

अभिनेत्री आणि ‘सेक्रेड गेम्स’ फेम कुब्रा सैतचा (Kubra Sait) आज (२७ जुलै) वाढदिवस आहे. अभिनेत्री असण्यासोबतच कुब्रा एक मॉडेल देखील आहे. ‘सेक्रेड गेम्स’मधील आपल्या दमदार अभिनयाने कुब्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘सेक्रेड गेम्स’ने रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली कुब्रा व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्मुयामुळे जास्त चर्चेत असते. कुब्रा हिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अशी अनेक रहस्ये तिच्या पुस्तकात उघड केली आहेत, जी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या पुस्तकात कुब्राने लैंगिक शोषणापासून वन नाईट स्टँड आणि गरोदर राहण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे.

कुब्रा सैतने (kubbra sait) तिच्या ‘ओपन बुक: नॉट क्वाएट अ मेमोयर’ या पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे की, तिच्या काकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. कुब्राने सांगितले होते की, एकदा एक व्यक्ती तिला एका रेस्टॉरंटमध्ये भेटला, जेव्हा ती तिच्या कुटुंबासह बंगळुरूमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. या भेटीनंतर ती व्यक्ती हळूहळू कुब्राच्या कुटुंबाच्या खूप जवळ आली. ती व्यक्ती प्रत्येक सुख-दु:खात कुब्राच्या कुटुंबासोबत असायची. त्याच्याकडे कुब्राच्या कुटुंबाची सर्व माहिती होती. हळुहळू त्या व्यक्तीने कुब्राच्या कुटुंबीयांच्या मजबुरीचा फायदा घेण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीला कुब्रा अंकल म्हणत आणि त्याच व्यक्तीने कुब्राचा विनयभंग केला होता. कुब्राने सांगितले की, त्या व्यक्तीने सुमारे अडीच वर्षे तिचे शोषण केले होते.

कुब्रा सैतने ‘ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर’ या पुस्तकात तिच्या वन नाईट स्टँडबद्दलही लिहिले आहे. तिने सांगितले की, वन नाईट स्टँडनंतर ती गरोदर राहिली आणि त्यानंतर तिचा गर्भपात झाला. तरी तिला याबद्दल कोणतीही खंत नाही. ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा ती २०१३ मध्ये अंदमानच्या सहलीला गेली होती. या ट्रीपमध्ये कुब्रा प्यायल्यानंतर तिच्या मित्राशी इंटीमेट झाली आणि त्यानंतर ती गरोदर राहिली.

हेही वाचा-

स्वत: च्याच मृत्यूची अफवा ऐकून संतापले अभिनेते प्रेम चोप्रा, दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

तेलुगू इंडस्ट्रीत माजली खळबळ! १ ऑगस्टपासून होणार नाही एकाही सिनेमाचे शूटिंग, काय भानगड?

समंथाची संपत्ती दिशा पटानीपेक्षाही जास्त, ताफ्यात जग्वार ते मर्सिडीज, ‘या’ महागड्या गाड्यांचा समावेश

 

हे देखील वाचा