Friday, July 12, 2024

अभिनेत्री मलाइका अरोराच्या गाडीचा अपघात, जखमी अभिनेत्रीला मनसैनिकांनी नेले रुग्णालयात

प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल मलाइका अरोरा हीच्या गाडीचा पनवेलजवळ अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. राज ठाकरे यांच्या सभेला निघालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या गाडीला मलाइका अरोराच्या गाडीने जोरदार धडक दिली. यात अभिनेत्री जखमी झाली. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी मलाइकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ( Actress Malaika Arora Car Accident )

Malaika-Car-Accident

प्राप्त माहितीनुसार पनवेलजवळ हा अपघात झाला. मलायकाच्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे त्याच्या गाडीने मनसे ( MNS ) पदाधिकाऱ्यांच्या तीन गाड्यांना धडक दिली. हे सर्वजण राज ठाकरे ( raj thackeray ) यांच्या सभेसाठी मुंबईच्या दिशेने चालले होते. या घटनेत मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर संवेदनशील मनसैनिकांनी तिला नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

( Actress Malaika Arora Car Accident Near Panvel MNS Activists Admitted Him To Hospital )

अधिक वाचा –

Fraud अभिनेता राजकुमार रावची झाली मोठी फसवणूक, सोशल मीडियावरुन माहिती देत केली ही विनंती

जेव्हा कपिल शर्मा त्याच्याच विद्यार्थ्यावर करत होता प्रेम, तेव्हा अशी फुलली प्रेमकथा

कर्क रोगाशी लढा देणार्‍या पतीच्या प्रकृतीबद्दल विचारताच अभिज्ञा भावे झाली भावूक

हे देखील वाचा