Tuesday, July 23, 2024

हे काय! मलायकाने सरड्यासारखा बदलला रंग, पाहा भन्नाट व्हिडिओ

बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा अतिशय मनमोहक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा लूक क्षणार्धात बदलतो. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे. तिच्या बेस्ट लूकवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओवर आतापर्यंत  हजारांहून अधिक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मलायकाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामच्या लोकप्रिय म्युझिक रीलला फॉलो करून बनवला आहे.

व्हिडिओ शेअर करताना मलायका अरोरा (malaika arora) हिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ओके चला हे करूया…’ व्हिडिओच्या सुरुवातीला मलायका जिमच्या आउटफिटमध्ये दिसत आहे आणि ब्लिंक करताना ती काळ्या साडीमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. साडीत तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये मलायका नेहमीप्रमाणेच छान दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

व्हिडिओ शेअर करून, मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही जबरदस्त फोटो शेअर केले होते, ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. फोटोमध्ये तिने मोती आणि कुंदनपासून बनवलेले हिरवे दागिने घातले होते. या फाेटाेवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Khanna Jewellers (@khannajewellerskj)

मलायकाचा ‘अरोरा सिस्टर्स’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
मलायका अराेराच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर मलायका तिची बहीण अभिनेत्री अमृतासोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवणार आहे. ती ‘अरोरा सिस्टर्स’मधून वेब डेब्यू करणार आहे. हा वेब शो पूर्णपणे तिच्या आणि बहीण अमृता अरोरा यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर केंद्रित असेल आणि या शोमध्ये मलायकाचा एक्स पती अरबाज खान आणि तिचा प्रियकर अर्जुन कपूर देखील या शोचा एक भाग असेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
पतीला चिअरअप करण्यासठी धनश्रीने गाठले ऑस्ट्रेलिया, पोस्ट शेअर करत उर्वशाला मारला टोमणा

चित्रपटात रोमँटिक सीन देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे यश चोप्रा होते ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे

हे देखील वाचा