हॉटनेस ओव्हरलोड! नेहमी पारंपारिक पोशाखात दिसणाऱ्या मिथिला पालकरला बिकनीमध्ये पाहून चाहते हैराण, तुम्हीही पाहा बोल्ड अंदाज

Actress Mithila palkar share her hot photos on Instagram


बॉलिवूडमधील सुंदर आणि सालस अभिनेत्री मिथिला पालकर. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. आपल्या साध्या वेशभूषेत ती सगळ्यांचे मन जिंकून घेते. खास करून पारंपारिक पद्धतीचा पोशाख ती परिधान करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर देखील तिला तिच्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत असते. पण आता नुकतेच मिथिलाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिला या अशा लूकमध्ये पाहून चाहते हैराण झाले आहेत.

मिथिलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे बिकनी घातलेले फोटो शेअर केले आहेत. तिचा लूक चाहत्यांना अक्षरशः वेड लावत आहे. तिने हे फोटोशूट स्विमिंग पूलमध्ये केले आहे. या फोटोमध्ये मिथिला काळ्या रंगाची बिकनी घालून स्विमिंग पूलमध्ये उभी राहून पोज देताना दिसत आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

तिने ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर केली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती. मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात वरुण नार्वेकर यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने 2014 मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.

तिने 2018 मध्ये इरफान खान सोबत ‘कारवां’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील या दोघांच्या आंबट गोड केमिस्ट्रीने सगळ्यांना खूप हसवले तसेच भावनिक देखील केले. तसेच तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायिका रेणुकाचे ‘५२ गज का दामन’ गाण्याच्या यशानंतर नवीन गाणे रिलीझ, अवघ्या ५ दिवसात १३ लाख हिट्स

-मोनालिसाही झाली ‘डोन्ट रश चॅलेंज’मध्ये सामील, डान्स मुव्हने लावले चाहत्यांना वेड

-आलिया भट्टचा ‘हा’ डायलॉग म्हणत चक्क रडली होती सारा अली खान, पाहा थ्रोबॅक व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.